पुणे

युवकाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल

CD

पुणे, ता. १८ ः पार्टी करून घरी जात असताना दुचाकी घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे मित्र एकाच दुचाकीवर जात असताना हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव दीपू परभेश राजभर (वय २१) असे आहे. दीपू याचा मित्र शोएब नयूम शेख (वय २५, दोघेही रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) हा या अपघातात जखमी झाला आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस हवालदार अनिल भोसले यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जानेवारीला ते खेड शिवापूर येथे पार्टीसाठी गेले होते. पार्टी करून परतत असताना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर नवीन बोगदा पार केल्यानंतर काही अंतरावर गतिरोधक आला. त्यावेळी दुचाकीस्वार शोएबने वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला, तेव्हा दुचाकी घसरली आणि दीपू दुचाकीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

भरधाव मोटारीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ः
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील राजा बहाद्दूर मिल रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अथर्व संभाजी पास्तापुरे (वय २१) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत नरसिंह संजय भांडारे (वय २४, रा. आनंदवाडी, ता. चाकूर, जि. लातूर) याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडारे यांचा मामेभाऊ दुचाकीस्वार अथर्व गुरुवारी (ता.१६) दुपारी पावणेबाराच्या सुमारास राजा बहाद्दूर मिल रस्त्याने निघाला होता. त्यावेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अथर्वला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अथर्वचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता मोटारचालक पसार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT