जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट)
‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीसीपीआर) नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा यूडीसीपीआर नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पी. एम. सी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २५ जानेवारीला होणार आहे. यात इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रिडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे, असे सर्व जण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
पाळीव प्राण्यांच्या व्यवसाय संधी
पाळीव प्राणी उद्योग झपाट्याने विस्तारत आहे, वाढत्या मागणीमुळे या व्यवसायात अनेक संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर याबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शन करणारी तसेच याच्या बिझनेस टू बिझनेस व्यवसाय संधींविषयी माहिती देणारी कार्यशाळा २५ जानेवारीला होणार आहे. कार्यशाळा पाळीव प्राण्यांच्या क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी होणार आहे. कार्यशाळेत या व्यवसायाचा परिचय व परीघ, आर्थिक महत्त्व, आव्हाने, संधी, उदयोन्मुख तंत्रज्ञान, सेवा व ट्रेंड, ग्राहकांची मागणी, पाळीव प्राण्यांचा व इतर सहायक उपकरणांचा पुरवठा, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण सेवा, पाळीव प्राणी काळजी सेवा, डॉग शो, पेट-टेक स्टार्टअप, व्यवसायाच्या संधीसाठी विशिष्ट आवश्यक मूलभूत कौशल्ये आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी, व्यवसायामध्ये विविधता आणू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
अमेझॉनवर उत्पादने विकण्यासाठी
प्रात्यक्षिकासह कार्यशाळा
अमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिजनेस कसा वाढवायचा, अमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रत्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २५ जानेवारीला होणार आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, अमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तात्काळ सपोर्ट कसा घ्यायचा, अमेझॉनमध्ये काही विभाग आहेत ज्यावर नोंदणी करून विक्री तिप्पट गतीने वाढवता येते, तिथे नोंदणी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अमेझॉनवर दररोज लाखो ग्राहक खरेदी करत असतात. त्यांच्यापर्यंत पोहचून आणि फक्त काही टिप्स व ट्रिक्स वापरून व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी या कार्यशाळेद्वारे उपलब्ध होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.