पुणे, ता. १८ : मुळा-मुठा संगमाच्या किनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सुमारे १३० किलो कचरा जमा करण्यात आला. ‘ओशन सेव्हर्स ऑफ इंडिया’ (इंडियन मेरीटाईमची शाखा), ‘इंडिया सी स्काऊट्स-गाईड्स’ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांनी हा उपक्रम राबविला. मोहिमेचे उद््घाटन ‘इंडियन मेरीटाईम फाउंडेशन’चे अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘ओशन सेव्हर्स ऑफ इंडिया’चे कमोडोर पी. के. मल्होत्रा, येझदी बाटलीवाला, मैथिली मनकवाड, सी स्काऊट्स ॲण्ड गाईड्सचे ‘कॅप्टन सुपरीन्टेडन्ट’ डॉ. गोपी शेट्टी, शगुफ्ता अन्वर, अंजुमन आय इस्लामच्या पॉलिटेक्निक फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनी व प्रा. कर्नल जुलिअस रॉक आदी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणासाठी योगदान दिल्याबद्दल कमोडोर पी. के. मल्होत्रा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.