पुणे, ता. २१ : पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर आज सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचा प्रवास खडतर ठरला. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना तास न् तास अडकून पडावे लागले. या कोंडीमुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळेदेखील वाहतूक विस्कळित झाली. गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता तसेच पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहराच्या मध्य भागातही पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली होती. रात्री आठ वाजेपर्यंत रस्त्यावरची कोंडी कायम राहिल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात, वाहतूक कोंडी होते, याची जाणीव असूनही महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून ठोस नियोजन होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
विशेषतः कार्यालयीन वेळेत पर्यायी वाहतूक मार्ग किंवा तत्परतेने खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यामुळे कोंडीची तीव्रता वाढत असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून नियोजनबद्ध उपाययोजना न झाल्यास आगामी दिवसांत पुणेकरांचा मन:स्ताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.
--------
फोटो ः 42002
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.