पुणे, ता. २२ ः खरीप हंगामासाठी डीएपी खताची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र या खताचा साठा मर्यादित आहे. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र (नायट्रोजन) आणि ४६ टक्के स्फुरद (फॉस्फरस) ही प्रमुख अन्नद्रव्ये असतात. डीएपी खताच्या उपलब्धतेमध्ये अडचणी असल्याने त्याच्याऐवजी युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) खतांचा संयुक्त वापर लाभदायक ठरू शकतो, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून, यात स्फुरद १६ टक्क्यांसह सल्फर आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यांमुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी आणि एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे, तर डीएपी खताची कमतरता असल्याने जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
संयुक्त खतांचा वापर उपयुक्त
एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६ व एनपीके १५:१५:१५ या संयुक्त खतांमुळे नत्र, स्फुरदबरोबरच पालाशही (पोटॅश) पिकांना मिळते. त्यामुळे या संयुक्त खताचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरते, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
ट्रिपल सुपर फॉस्पेट (टीएसपी) या खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून, डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी आणि टीएसपी एक गोणी खताचा वापर केल्यास तोदेखील डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.