पुणे

शहरातील रस्त्यांवर पावसामुळे खड्डेच खड्डे

CD

पुणे, ता. २५ : शहरात सुरु असलेल्या पावसामुळे आत्तापासूनच मुख्य रस्ते वगळता बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे, त्यामध्ये साठलेले पाणी व पसरलेल्या खडीमुळे वाहनचालकांना वाहने चालविणे मुश्कील झाले आहे, त्याचबरोबर वाहतुकीचा वेग देखील मंदावला आहे. शहरात जागोजागी खड्डे दिसत असले तरीही, महापालिकेने ७२४ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे.
शहरात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस सुरु झाल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. सलग पाऊस सुरु असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्ते, उपनगरे व समाविष्ट गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. अवजड वाहतूक सुरु असणाऱ्या रस्त्यांवर तर खड्डेच खड्डे दिसत आहेत. खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये वाहने गेल्यानंतर दुचाकीस्वारांचा तोल जाऊन वाहनांचे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस व मे महिन्याच्या सुरूवातीला महापालिकेकडून काही रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले. पावसानंतर डांबर बाजूला होऊन आता रस्त्यावर खडी पसरल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये असणाऱ्या चेंबरच्या झाकणांभोवतीचे डांबर, खडी निघाल्याने तेथेही खड्डे पडून त्यामध्ये पाणी साठत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

माहिती मिळताच दुरुस्ती
शहरात सलग पाऊस सुरु झाल्यानंतर सगळीकडे खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. महापालिकेस नागरिक, पीएमसी केअर ॲप, भरारी पथके, वाहतूक पोलिसांकडून खड्ड्यांबाबत तक्रारी येतात. १ एप्रिल ते २१ मे या कालावधीत महापालिकेच्या पथ विभागाकडे विविध माध्यमातून आलेल्या तक्रारीनुसार ७७८ खड्ड्यांची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार, महापालिकेने ७७८ पैकी ७२४ खड्डे बुजविले आहेत. आवश्‍यकतेनुसार कोल्डमिक्‍स, केमिकल कॉंक्रीटद्वारे खड्डे बुजविले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर खड्ड्यांची माहिती जशी मिळेल, त्यानुसार ते बुजविण्याची कामे केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खड्डे, पाणी साठण्याच्या ठिकाणी काम
वाहतूक पोलिस व महापालिकेच्या पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता यांचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. या ग्रुपवर जेथे खड्डे पडतात, जेथे पाणी साठले जाते. त्या ठिकाणची माहिती पाठविली जाते. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या पथ विभागाचे, मलनिःसारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी जाऊन काम करत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर आला आहे. तरीही, पावसामुळे पडणाऱ्या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती केली जात आहे. ७२४ खड्डे बुजविले आहेत. अजूनही सर्वेक्षण करून उपलब्ध तक्रारींची दखल घेत खड्डे बुजविले जात आहेत. याबरोबरच पाणी साठू नये, यासाठी महापालिकेकडून कामे केली जात आहेत.
- अनिरुद्ध पावसकर,
प्रमुख, पथ विभाग, महापालिका


शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मात्र, महापालिकेने ७२४ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. याबाबत तुमचे मत मांडा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT