पुणे, ता. २४ : ‘‘प्लास्टिकचा अनिर्बंध वापर रोखणे ही आजच्या काळाची गरज आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्लास्टिकचा प्रश्न गंभीर आहे. यातून विषयुक्त अन्नधान्याची निर्मिती होत आहे. जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण होत आहे. प्रदूषणात वाढ झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातूनच तापमानवाढीच्या जागतिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या करिता प्रत्येकाने झाडे लावून पर्यावरण वाचविण्याची गरज आहे’’, असे मत माजी सैनिक, वॉटरमॅन, पर्यावरणवादी रमेश खरमाळे यांनी केले.
ग्रीन सोल्यूशनच्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन रमेश खरमाळे व स्वाती खरमाळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रीन सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे, आरती भोसले-अहिवळे, लेखक शरद तांदळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे, ‘सीओईपी’चे सहअधिष्ठाता डॉ. संदीप मेश्राम, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विषयाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.