पुणे

श्वास थांबण्याआधीच उपचार

CD

पुणे, ता. २४ : दहा दिवसांपूर्वी १७ वर्षांच्‍या सपनाने (नाव बदललेले) विष प्राशन केल्याने तिला ससून रूग्णालयाच्‍या आपत्कालीन कक्षात उपचारासाठी आणले. परंतु, फुफ्फुस व शरीरात विष भिनत चालल्‍याने तिची तब्‍येत नाजूक व्‍हायला लागली अन् आपत्कालीन कक्षातील डॉक्‍टरांनी ‘कोड ब्‍लू’च्‍या पथकाशी संपर्क साधला. एक ते दोन मिनिटांच्‍या आत तेथे पथकातील डॉक्टर, भूलतज्‍ज्ञ, औषधोपचार तज्‍ज्ञ (फार्माकॉलॉजिस्ट), परिचारिकांचे प्रशिक्षित पथक दाखल झाले. त्‍यांनी तिला तातडीने ऑक्सिजन दिला अन् अतिदक्षता विभागात हलविले. उपचारानंतर सपना बरी होऊन घरी देखील गेली.

गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये ‘कोड ब्‍ल्‍यू’ पथकाने ससूनमध्‍ये आलेल्‍या ४ हजार २३८ इतक्‍या अचानक वैद्यकीय आणीबाणी निर्माण झालेल्‍या रुग्‍ण, नातेवाइकांना सेवा दिली आहे. ससूनमध्‍ये त्‍याची सुरवात जुलै २०२३ मध्‍ये तत्‍कालीन अधिष्‍ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केली. आताचे अधिष्‍ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुख्‍य समन्‍वयक डॉ. किरण कुमार जाधव, समन्‍वयक गौरव महापुरे, अधिसेविका विमल केदारी, प्रमुख परिचारिका शीला चव्‍हाण हे रुग्‍णालयातील सर्व विभाग प्रमुखांच्‍या साहाय्याने काम पाहतात.

काय आहे ‘कोड ब्लू’?
- वैद्यकीय क्षेत्रातील एक आणीबाणीच्या उपचारांचा हा विशेष संकेत आहे.
- त्‍याचा मुख्य उद्देश रुग्णाला त्वरित वाचविण्याची वेळ न गमावता उपचार सुरू करणे हा असतो.
- श्वास बंद पडणे, हृदय बंद पडणे किंवा ह्रदयविकाराचा झटका येणे, चक्‍कर येऊन पडणे, जागेवर कोसळणे अशा अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला तातडीचे उपचार मिळाल्‍यास त्‍याचा जीव वाचू शकतो.
- या रुग्णाला त्वरित ‘सीपीआर’ (बंद पडलेले हृदय सूरू करण्‍यासाठी हृदयावर दाब देणे), सलाइनद्वारे औषधोपचार, हृदय सूरू करण्‍यासाठी शॉक देणे, कृत्रिम ऑक्सिजन देणे व गरज पडल्‍यास अतिदक्षता विभागात दाखल करून पुढील उपचार सुरू करण्‍यासाठी हे पथक तीन पाळ्यांमध्ये २४ तासांसाठी कार्यरत आहे.

कसे काम चालते?
१) रुग्णालयाच्‍या आवारात, उपचार कक्षात, तातडीच्‍या कक्षात वैद्यकीय महाविद्यालयात अत्‍यवस्‍थ रुग्‍ण पाहिल्‍यास त्‍याची माहिती डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचारी हे रुग्‍णालयातील कोणत्‍याही दूरध्वनीवरून ७ नंबर डायल केला की तो टेलिफोन ऑपरेटरला देतात.
२) ऑपरेटर ‘कोड ब्लू’ असा उल्‍लेख करत नेमक्या ठिकाणाचा उल्‍लेख करतो.
३) ही घोषणा रुग्‍णालयाच्‍या सर्व उपचार कक्ष, उपाहारगृह, डॉक्‍टरांचे वसतिगृह येथे लावलेल्‍या शंभराहून अधिक स्‍पीकरद्वारे पोचते.
४) त्‍यावेळी ही सुसज्‍ज असलेली कोड ब्लू टीम दोन ते तीन मिनिटांच्‍या आत रुग्णाजवळ पोहचते व उपचार सुरू करते.

वर्ष - उपचार मिळालेले रुग्‍णसंख्‍या
जुलै ते डिसेंबर २०२३ : ९७२
जानेवारी ते डिसेंबर २०२४ : २४०२
जानेवारी ते ३० एप्रिल २०२५ : ८६४
एकूण : ४,२३८


सर्वच रुग्‍णांना वेळेवर उपचार मिळूनही त्‍यांना वाचवता आले नसले तरी त्‍यापैकी ७० ते ८० टक्‍के रुग्‍णांचे प्राण वाचविण्यास मदत झाली आहे. ही सेवा आणखी प्रभावीपणे सूरू राहण्‍यासाठी रुग्‍णालयातील सर्वच डॉक्‍टर, परिचारिका हे समन्‍वयाने काम करतात. त्‍यामुळे तातडीच्‍या रुग्‍णांचा जीव वाचण्‍यास मदत होते.
- डॉ. यल्‍लपा जाधव,
वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्‍णालय

आमच्‍या नातेवाईकाला ससूनच्‍या कक्षात असताना छातीत अचानक दुखायला लागले व ते बेशुद्ध झाले. मी हे तेथील परिचारिकांना सांगितले असता त्‍यांनी फोन केला व डॉक्‍टर काही बॅगा घेऊन आले आणि त्‍यांनी रुग्‍णाच्‍या छातीवर दाब दिला व इतर उपचार
केले. त्‍यामुळे रुग्‍ण पुन्‍हा शुद्धीत आल्‍याने त्‍यांचे प्राण वाचले.
- उजमा, रुग्‍णाची नातेवाईक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT