पुणे, ता. २४ : ‘‘जैन समाज भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर दृढ विश्वास ठेवतो आणि प्रत्येक निवडणुकीत भाजपसोबत खंबीरपणे उभा राहतो. हा विश्वास आणि पाठिंबा भविष्यातही कायम राहील,’’ असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी व्यक्त केला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठच्या वतीने पुणे मर्चंट्स चेंबर येथे जैन कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, या वेळी पांडे बोलत होते. या मेळाव्यात संघटनात्मक बांधणी आणि जैन समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व याविषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, मानसी देशपांडे, अविनाश शिळमकर, राजेंद्र भाटिया, बाळासाहेब धोका, रवी दुगड, अनिल नहार, मितेश नहाटा आदी उपस्थित होते.
भंडारी म्हणाले, ‘‘समाजाचे संघटन अधिक बळकट करत महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असून अठरा वर्षांपासून आनंद दर्शन युवा मंच, जैन कॉन्फरन्स, लायन्स क्लब, जैन सेना, जीतो अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम व समाजसेवेचे कार्य करीत आहोत.’’ तसेच जैन समाजातून भाजपच्या वतीने इच्छुक उमेदवारांमध्ये प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, महेंद्र सुंदेचा (मुथ्था), भरत भुरट, आनंद छाजेड, अरविंद कोठारी, श्रीमल बेदमुथा, प्रतीक देसरडा, कुंतीलाल चोरडिया, राजकुमार बाफना यांचा समावेश आहे असे भंडारी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.