पुणे

तारंगिणी प्रतिष्ठानतर्फे उद्या मासिक मैफील

CD

पुणे, ता. २४ : नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याला आयोजित केली जाणारी ‘मासिक मैफील सोमवारी (ता. २६) होणार आहे.
गेल्या महिन्यातील मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या महिन्याची मैफील सायंकाळी ६.३० वाजता एरंडवण्यातील अश्वमेध हॉल येथे होईल. या मासिक मैफिलीतील पहिल्या सत्रात युवा गायक आशिष रानडे आपली गायनकला सादर करणार असून, त्यांना उदय कुलकर्णी (हार्मोनिअम) आणि ऋषिकेश जगताप (तबला) अशी साथ देणार आहेत. या कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रात युवा सतारवादक आदित्य देशपांडे यांचे सतारवादन रसिकांना अनुभवता येणार आहे.
या उपक्रमाला व्हीजे परिवार आणि ईलाइट एव्हेंट्सचे सहकार्य लाभले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे रसिकांमध्ये कौतुक होत आहे. पुण्यातील संगीतप्रेमींनी या मैफिलीला उपस्थित राहून नव्या पिढीतील कलाकारांचे सादरीकरण अनुभवावे, असे आवाहन संयोजक अभेद अभिषेकी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे १५९ नागरिक बाधित

SCROLL FOR NEXT