पुणे

कोथरूडमध्ये पाणी तुंबू देऊ नका ः चंद्रकांत पाटील

CD

पुणे, ता. २४ ः हवामान विभागाकडून जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ज्या दिवशी मुसळधार पाऊस होईल तेव्हा कोथरूडमध्ये कोठेही पाणी तुंबू देऊ नका. पाणी वाहून गेले पाहिजे याकडे लक्ष द्या, असा आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला, तसेच पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी कोथरूड मतदारसंघात एक समन्वय अधिकारी नेमावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली.
कोथरूड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा पाटील यांनी शनिवारी घेतला. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त आशा राऊत, अविनाश संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गणेश सोनुने, भाजपचे कोथरूड मंडल अध्यक्ष नीलेश कोंढाळकर, कुलदीप सावळेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पुणे शहरासह कोथरूड भागातील पावसाळी पूर्व कामांची माहिती दिली. शहरात एकूण २०१ मुख्य नाले असून त्यापैकी १५ नाले हे कोथरूड मतदारसंघातून वाहतात. या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.

नालेसफाईवर नाराजी
चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत नालेसफाईच्या कामावर नाराजी व्यक्त करत ही कामे व्यवस्थित केली जात नाहीत असे नमूद केले. कोथरूडसह पुणे शहरातील नालेसफाईची कामे जलदगतीने पूर्ण करा. कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमा. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळापूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरूडमधील सर्व माजी नगरसेवकांना पाटील यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT