पुणे

नवीन धोरणात सर्वसमावेशक शिक्षणपद्धती

CD

पुणे, ता. २५ ः ‘‘विदेशात जाणाऱ्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. आपल्या देशातदेखील अनेक संधी उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा सारे जग भारतीय ज्ञान परंपरेकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक शिक्षणपद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनर्इपी) माध्यमातून आपण करत आहोत,’’ असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘आम्ही सारे ब्राह्मण’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‌‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार पंचांगकर्ते मोहन दाते यांना रविवारी (ता. २५) पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित होते.
शुक्ल यजु:शाखीय संस्थेचे जगदीश नगरकर, वास्तुविशारद हृषीकेश कुलकर्णी, सुनंदा निसळ तसेच संपादक भालचंद्र कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे, संचालिका माधुरी कुलकर्णी उपस्थित होते. गेल्या २२५ वर्षांतील विविध क्षेत्रांतील राष्ट्रकार्यासाठी समर्पित कर्तृत्ववान महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या ‌‘ब्राह्मण रत्ने’ या चरित्रकोश ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे दोन खंडांत प्रकाशन करण्यात आले. वंदना धर्माधिकारी लिखित ‘यशोगाथा-ब्राह्मण स्त्रियांच्या’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील यावेळी करण्यात आले.

पाटील म्हणाले, ‘‘इंग्रजांनी निर्माण केलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी काय करता येर्इल याचा विचार ‘एनईपी’मध्ये करण्यात आला आहे. देशात अशी कोणती व्यक्ती नसेल जी मुहूर्त मानत नाही. हा मुहूर्त काढण्याचे काम पारंपरिक पद्धतीने एका समाजाकडे आले आहे. त्या कामाला कोणी नावे ठेवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करत आपण काम योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे आहे.’’ कुलकर्णी आणि ओर्पे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली.
‘‘ब्राह्मण समाजाने अनेक चांगली कामे केली आहेत. त्याचा लाभ पुढील अनेक पिढ्यांना मिळत आहे. ज्योतिष थोतांड आहे, असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केलेला नाही. विज्ञानाची वाढ होत असताना आपण ज्ञान हरवून बसलो आहोत की काय, अशी चिंता आता वाटते आहे. शिक्षणाचे टप्पे सध्या त्याच पद्धतीने राहिले नाहीत. आपल्याकडे सर्व आहे व होते; पण ते शिकवले जात नाही. कारण. त्यांची माहितीच आपल्याला नाही. शाळेत न गेलेले विद्यार्थी देशाला काय हातभार लावणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे’’, असे अभ्यंकर म्हणाले.

कुलकर्णी यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडली. ओर्पे यांनी ग्रंथ निर्मिती आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या निर्मितीचा उद्देश सांगितला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी कुलकर्णी यांनी आभार मानले.


यांना गौरविले
‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराबरोबरच यंदाचा ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार युवा उद्योजक निर्मल देशपांडे यांना, ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार’ पुरस्कार युवा कीर्तनकार पुरस्कार किरण कुलकर्णी यांना, तर ब्राह्मण समाजासाठी गेली ९८ वर्षे काम करणाऱ्या श्री शुक्ल यजुःशाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा या संस्थेला ‌‘भगवान परशुराम ब्राह्मण संस्था’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे यंदाचे बारावे वर्ष असून मानपत्र, पुणेरी पगडी, रोख रक्कम आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कोथरूड ः ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‌‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार मोहन दाते यांना रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) हृषीकेश कुलकर्णी, संजय ओर्पे, शंकर अभ्यंकर, दाते, पाटील, भालचंद्र कुलकर्णी, जगदीश नगरकर.

17324

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bank Interest Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तुमच्या EMIवर होणार परिणाम; व्याजदर वाढणार की कमी होणार?

Latest Marathi News Updates Live : पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटतात ही मोठी गोष्ट : संजय राऊत

'मला रडणं जमलं नाही, म्हणून कानशिलात मारली', पल्लवी जोशींच्या सांगितली वेदनादायक आठवण, म्हणाली...'बाबांसमोर मला मारलं आणि...'

VIDEO : पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यातून नवजात बाळाला डोक्यावर घेऊन निघाले आई-वडील...लोक म्हणाले कृष्णजन्माचा प्रसंग आठवला

SCROLL FOR NEXT