पुणे

जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्त्रीबीज निर्मितीवर परिणाम

CD

पुणे, ता. २५ ः सशक्‍त गर्भधारणा व पुनरुत्‍पादक क्षमता विकसित होण्‍यासाठी स्त्रियांच्या शरीरात पुरेसे व्हिटॅमिन डी, बीट्‌वेल, फॉलिक अॅसिड ही जीवनसत्‍वे गरजेची आहेत. त्‍याअभावी त्‍यांच्‍यामध्‍ये ‘अँटी-म्युलेरियन हार्मोन’ (एएमएच) हे संप्रेरक प्रभावित होते व गर्भधारणेवर परिणाम होतो. गर्भधारणेचे नियोजन करत असलेल्या महिलांनी शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी तपासून घ्यावी. तसेच, २५ ते ३५ वयोगटातील महिलांनी ही जीवनसत्‍वे असलेला आहार घ्यावा, असे आवाहन वंध्‍यत्‍व व प्रसूतितज्‍ज्ञांनी केले आहे.
२५ ते ३० वयोगटात महिलांमध्‍ये या जीवनसत्त्वांची कमतरता अधिक प्रमाणात दिसून येते. त्‍यासाठी ‘एएमएच’ ही चाचणी करण्‍याचा सल्‍ला दिला जातो. ‘एएमएच’च्‍या अभावी अंडाशयातील स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्तेचा अंदाज येतो. स्त्रियांच्या पुनरुत्‍पादकता व प्रजनन आरोग्यासाठी हे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्‍या सल्‍ल्‍यानुसार व्हिटॅमिन डी, बीट्‌वेल आणि फॉलिक अ‍ॅसिड या जीवनसत्त्वांचा आहारात योग्य समावेश न झाल्यास हार्मोनल संतुलन बिघडते आणि स्त्रीबीजांची गुणवत्ता तसेच पुनरुत्‍पादकता क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे, प्रजनन आरोग्‍य विषयक समस्यांचा सामना करत असलेल्या महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

चुकीच्या आहारपद्धती, मानसिक तणाव, पचनाचे विकार, पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस) आणि थायरॉइड विकार अशा अनेक कारणांमुळे महिलांमध्ये थकवा, केस गळणे, त्वचेला फिकटपणा, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि मासिक पाळीतील अनियमितता ही लक्षणे आढळतात. या पार्श्वभूमीवर, वेळेवर रक्त तपासण्या करून योग्य निदान करणे आणि संतुलित, पोषक आहार घेणे यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. बुशरा खान यांनी केले. शरीरात आवश्यक व्हिटॅमिन्सची पातळी संतुलित असल्यास ‘एएमएच’ची पातळीही योग्य राहते, असेही त्‍या म्‍हणाल्‍या. वेळेवर जीवनसत्त्वांची कमतरता ओळखून गर्भधारणा सुलभ करता येईल, असे स्‍त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीतिका शेट्टी यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी
- महिलांनी हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं, काजू, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करावा
-‘व्हिटॅमिन डी’ची पूर्तता करण्यासाठी सकाळी किमान २० मिनिटे सूर्यप्रकाशात राहणे, नियमित योगा व ध्यान करणे आणि तणाव कमी करणे
- गर्भधारणेची योजना करत असलेल्या महिलांनी वंध्‍यत्‍व तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT