पुणे, ता. २५ ः पुणे विमानतळावर एप्रिलमध्ये सुरू झालेल्या ‘उडान यात्रा कॅफे’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या कॅफेमध्ये तुलनेने खूप कमी किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. चहा व समोसा यांना सर्वांत चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यानंतर कॉफी व वडापावला प्रवाशांची मागणी आहे. दोन दिवसांत एक हजार ४७ कप चहाची, तर ७४८ समोसाची विक्री झाली.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर ‘निर्गमन’ गेटजवळ विमानतळ प्रशासनाने सामान्य प्रवाशांसाठी कमी दरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे यासाठी ‘उडान यात्रा कॅफे’ सुरू केले. याचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते २८ एप्रिलला झाले. पुणे विमानतळावर अवघ्या १० रुपयांत चहा, कॉफी उपलब्ध झाल्याने सामान्य प्रवाशांची सोय झाली. उडान यात्रा कॅफे सुरू झालेले पुणे विमानतळ हे देशातील चौथे विमानतळ आहे. यापूर्वी कोलकता, चेन्नई आणि अहमदाबाद विमानतळावर ही सेवा सुरू झाली आहे.
असे आहेत दर
- पिण्याच्या पाण्याची बाटली : १० रुपये
- चहा : १० रुपये
- कॉफी : २० रुपये
- समोसा : २० रुपये (एक नग)
- वडापाव : २० रुपये.
- मिठाई : २० रुपये
काय सांगते आकडेवारी
पाणी : २३४ १९७
चहा : ५५३ ४९४
कॉफी : २६३ २८७
समोसा : ३९४ ३५४
वडापाव : २९९ ३३०
मिठाई : ५७ ५३
उत्पन्न : २८ हजार १३० २७ हजार ३९०
(ही आकडेवारी मे महिन्यातील १६ व १७ तारखेची आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.