पुणे

इन्स्टंट ग्रेव्ही व मिक्सेस कार्यशाळा

CD

पुणे, ता. २६ : धावपळीच्या जीवनशैलीमुळे झटपट, स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्नाची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेडी टू कुक अन्न उद्योगामध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात मार्गदर्शन करणारी दोन दिवसीय व्यावसायिक कार्यशाळा ३१ मे व १ जून रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत इन्स्टंट डोसा, इडली, वडा, ढोकळा, पोहे, उपमा, शिरा, पुलाव, दाल खिचडी, फालुदा, खीर, रबडी, आइस्क्रीम मिक्स, गुलाबजामून, पकोडा, तसेच मल्टीग्रेन पराठा, थालीपीठ भाजणी, उपवास भाजणी यांसारखे विविध इन्स्टंट फूड मिक्सेस शिकवले जातील. याशिवाय पंजाबी, कोल्हापुरी, हैदराबादी, व्हाइट, मिसळ, सांबार, सावजी, तंदूर, चौपाटी, खर्डा अशा नावीन्यपूर्ण ड्राय ग्रेव्ही प्रकारांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक होईल. या प्रशिक्षणात फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, यंत्रसामग्री, वितरण व्यवस्था, कॉस्टिंग व कायदेशीर बाबींचाही समावेश असेल.
संपर्क : ८४८४८११५४४

राजकीय नेतृत्व विकास कार्यशाळा
आज अनेक युवक राजकारणात सक्रिय होत आहेत, मात्र नेतृत्व कौशल्य व राजकीय समज नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. ही गरज ओळखून राजकीय नेतृत्व विकास या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन ७ व ८ जूनला केले आहे. कार्यशाळेत मतदारसंघ विश्लेषण, सर्व्हे, प्रचार योजना, टीम उभारणी, जनसंपर्क, मीडिया हाताळणी, वॉर रूम व्यवस्थापन आणि निवडणूक रणनीती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्या किंवा आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. अनुभवी राजकीय विश्लेषक, निवडणूक शास्त्रज्ञ व प्रचारकांचे मार्गदर्शन लाभणार असून, ही संधी दीर्घकालीन राजकीय यशासाठी महत्त्वाची ठरू शकते.
संपर्क : ८४८४८११५४४

सरकारी बाजारपेठ प्रशिक्षण
सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई-बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. या पोर्टलवर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्थांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तूंची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी प्रारंभापासून अखेरपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबतच मार्गदर्शन करणारे ऑनलाइन दोन आठवडे चालणारे प्रशिक्षण ९ जूनपासून आयोजिले आहे. व्यवसाय वाढीसाठी हे उपयुक्त प्रशिक्षण आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

शेती उत्पादनांसाठी पॅकेजिंग, लेबलिंग आणि ब्रँडिंग
शेती उत्पादनांच्या पॅकेजिंग, लेबलिंग आणि ब्रँडिंग या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करणारी विशेष कार्यशाळा १५ जूनला आयोजिली आहे. आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि उत्पादनाला चांगली किंमत मिळवण्यासाठी प्रभावी पॅकेजिंग व ब्रँडिंग आवश्यक आहे. प्रशिक्षणात विविध पॅकेजिंग मटेरिअल, भांडवल नियोजन, तंत्रज्ञानातील सुधारणा, खर्चात बचत, लेबलिंगसाठी आवश्यक बाबी आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्याचे तंत्र यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल. योग्य पॅकेजिंगमुळे उत्पादनाची शेल्फ लाइफ वाढते, वाहतूक व साठवणूक खर्च कमी होतो आणि स्पष्ट लेबलिंगमुळे ग्राहकांना उत्पादनाची माहिती समजून घेता येते. ब्रँडिंगमुळे शेतकऱ्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते आणि बाजारात उत्पादनाला अधिक किंमत मिळते. हे प्रशिक्षण
ग्रामीण युवक, कृषी उद्योजक, बचत गट सदस्य आणि थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ९१५६०१००६०, ८९५६७१२६३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT