पुणे

कौटुंबिक वादातून बोपोडीत भावाच्या खूनाचा प्रयत्न

CD

पुणे, ता. २७ ः कौटुंबिक वाद तसेच पाहुण्यांसोबत गप्पा मारत जेवत असताना मोठ्या आवाजात बोलू नका, असे म्हणत लहान भावाने मोठ्या भावावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बोपोडीतील कमलाबाई बहिरट चाळीत शुक्रवारी (ता. २३) ही घटना घडली.
याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात वफाद शेख (वय ४५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा तक्रारदार यांचा दीर आहे. ते शेजारी-शेजारी राहण्यास आहेत. तीन दिवसांपूर्वी त्या व त्यांचे पती आणि काही नातेवाईक घरी गप्पा मारत जेवण करत होते. तेव्हा आरोपी त्यांच्या दरवाजात आला. त्याने आवाज करू नका, असे बोलून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून वादावादी झाली. त्या रागात आरोपीने तक्रारदार यांच्या पतीवर हत्याराने मानेवर व गालावर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तक्रारदाराचे पती हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

SCROLL FOR NEXT