पुणे, ता. २७ : ‘‘नाट्य-चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुण कलाकारांनी सर्वप्रथम एकांकिकांमध्ये काम करावे. त्यानंतर दीर्घांक, प्रायोगिक नाटक आणि मग व्यावसायिक नाटक, अशा क्रमाने काम करत शिकावे. रंगभूमीवर कलाकाराची सर्वांगीण तयारी होते. त्यामुळे कलाकाराचा प्रवास नाटकाकडून चित्रपटाकडे झाला पाहिजे’’, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त परिषदेच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण दामले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, शोभा कुलकर्णी, कोषाध्यक्ष अशोक जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांना नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, अवंती बायस यांना माणिक वर्मा पुरस्कार, प्राजक्ता हनमघर यांना इंदिरा चिटणीस पुरस्कार, प्रशांत तपस्वी यांना यशवंत दत्त पुरस्कार, निपुण धर्माधिकारी यांना पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार, राहुल जोशी यांना वसंतराव देशपांडे पुरस्कार, सुवर्णा चव्हाण यांना गो. रा. जोशी पुरस्कार, चिन्मय पाटसकर यांना गंगाधरपंत लोंढे पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेश साखवळकर यांना ५० वर्षांहून अधिककाळ केलेल्या नाट्यसेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी जयवंत दळवी, गोविंदराव पटवर्धन, श्रीनिवास खळे आणि माणिक वर्मा यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करणारा ‘मानवंदना’ हा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन दीपक रेगे आणि निनाद जाधव यांचे होते. संजय गोसावी आणि मधुरा टापरे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.