पुणे

अनुभवा पुलंचे चतुरस्र कलावैभव

CD

पुणे, ता. ३१ : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे यांचे चतुरस्र कलावैभव उलगडण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘नक्षत्रांचे देणे-पु. ल. देशपांडे’ या विशेष कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम २० जूनला सायंकाळी ६.३० वाजता कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे होणार आहे.
‘नक्षत्रांचे देणे’ हा साहित्य, संगीत आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा धांडोळा घेणारा आणि त्यांचा जीवनपट रंजक पद्धतीने उलगडून दाखवणारा कार्यक्रम आहे. पु. ल. देशपांडे यांच्यावर आधारित हा कार्यक्रम ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे प्रस्तुत करण्यात येत असून, याची संकल्पना आणि सादरीकरण ‘इंडियन मॅजिक आय’ यांचे आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘एसके फॉर्च्युन ग्रुप’ असून सहयोगी प्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे आहेत.
पु. ल. देशपांडे यांच्या चतुरस्र प्रतिभेची सफर या कार्यक्रमातून रसिकांना घडणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा या कार्यक्रमात साकारण्यात येणार आहे. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचेही सादरीकरण याप्रसंगी होईल. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील निवडक भागांच्या अभिवाचनाचाही यात समावेश असेल. आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, गिरिजा ओक-गोडबोले, पं. रघुनंदन पणशीकर, हृषिकेश कामेरकर, अंजली मराठे आदी कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. याची संकल्पना व दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांचे आहे.
या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाली आहे. ही तिकिटे आरक्षित करण्यासाठी ticketkhidakee.com किंवा bookmyshow.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे.


आर्थिक सेवा क्षेत्रात काम करत असतानाही आपल्या सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे हे आमचे कर्तव्य आहे. ‘नक्षत्रांचे देणे- पु. ल. देशपांडे’ यासारख्या उपक्रमांतून आम्ही समाजात सकारात्मक ऊर्जा पेरण्याचा प्रयत्न करत आहोत.
- सुशील जाधव,
विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

हे लक्षात ठेवा
- काय : ‘नक्षत्रांचे देणे - पु. ल. देशपांडे’
- कधी : २० जून २०२५
- केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
- कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

तिकिटे आरक्षित करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT