पुणे

सेंद्रिय किचन गार्डन ऑनलाइन सिरीज

CD

पुणे, ता. ३१ : किचन गार्डन ही गार्डनिंग क्षेत्रातील एक प्रभावी आणि उपयुक्त संकल्पना असून याद्वारे पालेभाज्या, फळभाज्या व औषधी वनस्पती घरातच सेंद्रिय पद्धतीने पिकवता येतात. घरच्या घरी भाजीपाला व शोभेची झाडे उगम पावावीत, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी ही संधी खास आहे. २ जूनपासून सुरू होणाऱ्या ५ दिवसीय ऑनलाइन लेक्चर सिरीजमध्ये पुढील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. किचन गार्डन म्हणजे काय व त्याचे प्रकार, गार्डन लेआउट आणि नियोजन, पॉटिंग मिक्शचर, बियाणे निवड व रोपे तयार करण्याच्या पद्धती, झाडांसाठी सिक्रेट टिप्स, घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्याच्या आठ सेंद्रिय पद्धती, नैसर्गिक खतांद्वारे झाडांचे पोषण, पाण्याचा कार्यक्षम वापर, सेंद्रिय व इको-फ्रेंडली कीडनाशक उपाय ही सिरीज घरच्याघरी बाग फुलवू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

जर्मन भाषेचा प्रगत अभ्यासक्रम
जर्मन ही अशी आंतरराष्ट्रीय भाषा जी शिकल्याने भरपूर करिअर संधी उपलब्ध होतात. याचे कारण जर्मनी ही युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि कॉर्पोरेशन हे जर्मन आहेत. भारत ही त्यांची वाढती बाजारपेठ असल्याने जर्मन भाषा अनुवादक, जर्मन दुभाषी आणि जर्मन प्रशिक्षकांना भारतात नेहमीच मागणी होती आणि पुढेही राहणार आहे. जर्मन शिकल्याने रेझ्युमेला वजन प्राप्त होते आणि नोकरीच्या बाजारपेठेतील रोजगारक्षमता वाढते. जर्मनीमध्ये जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या सर्व संधींचा लाभ घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. जर्मन भाषेचा १२० तासांचा (लेव्हल ए-१ व लेव्हल ए-२) प्रमाणपत्र अभ्यासक्रम २ जूनपासून सुरु होत आहे.
संपर्क : ८४८४८२२१६६

औषधी वनस्पती लागवड
ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी तीन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा ९ जूनपासून आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

पॅकेजिंग तंत्रज्ञान उद्योग कार्यशाळा
प्रक्रिया केलेले सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लॅस्टिक इ.विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल लागत असून बाजारात याची प्रचंड मागणी आहे. हे मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी भांडवल इ.विषयी सविस्तर माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ९ जूनपासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इ.विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप करायचे आहे तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे इ. साठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT