पुणे, ता. ३१ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शिवसेनेतर्फे पुणे शहरातील कोथरूड, खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. यावेळी व्यसनमुक्ती चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती दिली.
गंगवाल म्हणाले, ‘‘भारतातील तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. सरकारने तंबाखू, गांजा, अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांची शेती जप्त करावी. छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा उत्पादनावरच बंदी घालून त्यांची सर्व मालमत्ता जप्त करावी.’’
शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘‘पुण्यात तंबाखूजन्य पदार्थांविरोधात शिवसेना कायम आंदोलन करत आहे. जिथे ड्रग्ज सारख्या अमली पदार्थांचे उत्पादन होत आहे, तेथे पोलिसांच्या मार्फत कारवाई करत राहू. तरुणांना व्यसनांपासून रोखण्याचा प्रयत्न करू.’’
येरवड्यातील कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे हेमंत बत्ते, हडपसर येथे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, नामदार गोखले चौकात युवा सेना राज्य सचिव किरण साळी, खडकवासला येथे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, कोथरूड येथे उदय भेलके आदींनी तंबाखूजन्य पदार्थांची होळी केली. यावेळी सुधीर जोशी, अविनाश खेडेकर, नीलेश गिरमे, सुदर्शना त्रिगुणाईत, राजाभाऊ चौधरी, शंकर संगम, उद्धव गलांडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘आम्ही व्यसन करणार नाही’ अशी शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता कण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.