पुणे, ता. ३१ : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प असून बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. जानेवारीपासून राज्यात एकूण १० हजार ९१५ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी ७४९ रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत २५७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ३४ इतकी आहे.
राज्यात शनिवारी एकूण ६८ नवे रुग्ण आढळले. यामध्ये पुणे जिल्ह्यात दोन तर पुणे महापालिकेच्या हद्दीत १५ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यभरात ४८५ सक्रिय रुग्ण आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत इन्फ्लुएन्झा सदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (सारी) याअंतर्गत तपासणी व उपचार सुरू आहेत. ही सेवा मोफत असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन साथरोग विभागाने केले आहे.
राज्यातील मृत्यू झालेल्या सात रुग्णांमध्ये सहव्याधी जसे, मधुमेह, फुफ्फुस विकार, मेंदू विकार आढळले होते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी व सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात तसेच देशाच्या इतर भागातही कोरोनाची सौम्य वाढ सुरू असून याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.