पुणे

उद्यापासून आरोग्य, पर्यावरण, तंत्रज्ञान विषयांवर परिषद

CD

पुणे, ता. १६ : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैज्ञानिक, आरोग्यसेवातज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी यांना एका व्यासपीठावर येऊन आरोग्य, पर्यावरण व सामाजिक कल्याण यावर निगडित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे ‘सिमरिसर्च २.०- बायोइंजिनिअरिंग फॉर ग्लोबल हेल्थ’ ही आंतरराष्ट्रीय परिषद गुरुवार (ता. १८) ते शनिवार(ता. २०)दरम्यान सिंबायोसिसच्या लवळे कॅम्पसमध्ये होणार आहे.
‘री-इंजिनिअरिंग हेल्थ, रीडिफायनिंग हेल्थ, एम्पॉवरिंग लाइव्हज’ हे परिषदेचे घोषवाक्य असून ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ या तत्त्वज्ञानाशी ती जोडलेली आहे. याप्रसंगी आनुवंशिक, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, पोषण, हवामान बदल, जैववैद्यकीय प्रतिमा, वैयक्तिक औषधोपचार, तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवा आदी विषयांवर चर्चासत्रे होतील. परिषदेला चर्चेचे तीन प्रमुख विषय असणार आहेत, ‘सर्वांसाठी आरोग्य’ (हेल्थ फॉर ऑल), ‘शाश्‍वतपणा’ (सस्टेनेबिलिटी) आणि ‘युवाशक्ती सक्षमीकरण’ (युथ एम्पॉवरमेंट).

पूर्वपरिषद कार्यशाळा
परिषदेपूर्वी गुरुवारी (ता. १८) पदवीधर, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तिचे उद्‌घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार असून, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘सीएसआयआर’चे माजी महासंचालक डॉ. आर. ए. माशेलकर असतील. तसेच समारोपावेळी ‘डीएसटी’चे सचिव डॉ. अभय करंदीकर, ‘आयसार’ तिरुपतीचे विशिष्ट मानद प्राध्यापक डॉ. के. एन. गणेश उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी नवी दिल्ली येथील ‘आयएलबीएस’चे संचालक डॉ. शिवकुमार सारिन, प्रा. डॉ. शेखर मांडे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. या कार्यशाळेची ऑनलाइन नावनोंदणी करण्याची मुदत संपली असून, जागेवर नोंदणी चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT