पुणे

संगणकशास्त्रासह एआय, डेटा सायन्सला विद्यार्थ्यांची पसंती

CD

पुणे, ता. १६ : अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या (बी.ई. आणि बी.टेक) प्रवेशात यंदाही संगणक अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील एकूण दोन लाख दोन हजार ८८३ जागांपैकी ८२.१८ टक्के म्हणजेच एक लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केला आहे. मात्र, तरीही या अभ्यासक्रमाच्या तब्बल १७.८१ टक्के जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (प्रथम वर्ष बी.ई. आणि बी.टेक) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा प्रवेशाच्या ‘कॅप’अंतर्गत चार आणि संस्थास्तरीय प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सीईटी कक्षाने अधिकृतरीत्या संकेतस्थळाद्वारे जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या जागा २२ हजार ७१३ इतक्याने वाढल्या आहेत.
........
संगणकशास्त्रासह एआय, डेटा सायन्स आणि संलग्न अभ्यासक्रमांतील प्रवेशाची आकडेवारी (गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी) :
-------------
अभ्यासक्रम : वर्ष २०२४-२५ (प्रवेश क्षमता : प्रवेश घेतलेले विद्यार्थी : प्रवेशाची टक्केवारी) ::/ वर्ष २०२५-२६ (प्रवेश क्षमता : प्रवेश घेतलेले विद्यार्थी : प्रवेशाची टक्केवारी)
----------------
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग : २९,७०२ : २६,८६५ : ९०.४५ टक्के ::/ ३२,२५० : २७,९९५ : ८६.८१ टक्के

कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग : १६,५६४ : १५,००० : ९०.५६ टक्के ::/ १९,८९७ : १७,६५० : ८८.७१ टक्के
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी : १४,८२७ : १३,८२३ : ९३.२३ टक्के ::/ १७,३४६ : १५,१७८ : ८७.५० टक्के
आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) ॲण्ड डेटा सायन्स : ७,५४९ : ६,९७९ : ९२.४५ टक्के ::/ १०,१३५ : ८,९३५ : ८८.१६ टक्के
कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग (एआय/एमएल) : ४,८६७ : ४,५४४ : ९३.३६ ::/ ५,७८६ : ५,४६० : ९४.३७ टक्के
आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग : - : - : - ::/ ४,४५७ : ३,७०८ : ८३.१९ टक्के
आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स : २,८३० : २,४८० : ८७.६३ टक्के ::/ ३,८४७ : ३,३६२ : ८७.३९ टक्के
-----------------------
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमात संगणक अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स अशा अभ्यासक्रमांमध्ये सध्या खूप जास्त संधी आहेत. त्यामुळे हे अभ्यासक्रम केल्यानंतर इतरांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या (प्लेसमेंट) मिळतात, तसेच सरासरी सात ते दहा लाख (प्रतिवर्ष) रुपयांची नोकरी मिळू शकते. याशिवाय नोकरीत कामाच्या तासात लवचिकता, घरातून काम करण्याची सुविधा, यामुळेही विद्यार्थ्यांची पसंती या अभ्यासक्रमांना सर्वाधिक आहे.
- डॉ. विनायक जोशी, संगणकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT