पुणे

संमत्रिपत्रे सादर करण्याची मुदत पाच दिवसांनी वाढविली

CD

पुणे, ता. १९ : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दिलेल्या मुदतीत ९० टक्के जागा संपादनासाठी संमतिपत्रे दाखल केल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना संमती देण्यासाठी पाच दिवसांची आणखी मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. त्यामुळे २५ सप्टेंबरपर्यंत जागा मालकांना संमतिपत्रे सादर करता येणार आहे. दरम्यान, शुक्रवारपासून (ता. २६) जमीन मोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे.

जमिनीव्यरिक्त भूसंपादनात जाणाऱ्या मालमत्तेची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करून त्याचा समावेश मोबदल्यात दिला जाणार आहे, तर मोजणीसाठी सोमवारपासून (ता. २२) शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

पुरंदर विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांकडून त्यापूर्वी संमतीपत्रे घेण्यात आली आहेत. त्यासाठी २६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सुमारे २ हजार ८० शेतकऱ्यांनी एकूण २ हजार ७०० एकर जमिनीच्या संपादनासाठी संमती दर्शविली आहे. त्यानुसार पत्रही दिले आहे. मात्र, अजूनही १० टक्के अर्थात ३०० एकर जमिनीच्या संपादनासाठी संमती आलेली नाही. मुदतीत संमती न दिल्याने या शेतकऱ्यांना विकसित भूखंडाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी सर्व गावांमधील सरपंच आणि ग्रामस्थांनी ही मुदत आणखी वाढवून द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार ही मुदत आता गुरुवारपर्यंत (ता. २५) वाढवून देण्यात आली आहे.

काही शेतकऱ्यांचे सामाईक क्षेत्र असल्याने अंतर्गत वाद असल्यास त्यांच्याकडून संमतिपत्रे देण्यात आलेली नाही, तर काही शेतकऱ्यांचे मालमत्ताविषयक महसुली आणि दिवाणी न्यायालयात दावे सुरू आहेत. त्यांनाही संमती देता आलेली नाही. अशा शेतकऱ्यांना न्यायालयाच्या निकालाशी अधीन राहून संमती देता येईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संमतीपत्रे देण्याची वाढीव मुदत संपल्यानंतर शुक्रवारपासून जमिनीच्या मोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहेत. त्यात जमिनीव्यतिरिक्त घर, विहीर, पाइपलाइन, झाडे, फळझाडे तसेच अन्य मालमत्तेचा तपशील द्यावा लागणार आहे. यामुळे मोजणीनंतर करण्यात येणाऱ्या मुल्यांकनात या मालमत्तेचा अंतर्भाव केला जाऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत मुंजवडी येथील ९८ टक्के जमिनीसाठी संमतिपत्रे देण्यात आली आहे, तर उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी येथील गावांमधील ९५ टक्के, तसेच पारगाव, वनपुरी आणि कुंभारवळण येथील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीचे संमतिपत्रे दाखल झाली आहेत.
------------------------
सरपंच, ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही अशांना ही संधी आहे. त्यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नाही. २६ सप्टेंबरपासून जमीन मोजणीस सुरुवात केली जाणार आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs OMN Live: भारताची विजयी हॅटट्रिक! Super 4 मध्ये रविवारी IND vs PAK सामन्याची मेजवानी; जाणून घ्या पुढील सामन्यांचे वेळापत्रक

IND vs OMN Live: हार्दिक पांड्याची मॅच विनिंग कॅच! अर्शदीप सिंगने रचला इतिहास, ओमानच्या कलीमने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

Sam Pitroda clarification : ''पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं'' म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

IND vs OMN Live: ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला का आला नाही? समोर आलं कारण...

SCROLL FOR NEXT