पुणे

पुण्यातील रस्ते खड्डेमुक्तीवर प्रश्‍नचिन्ह

CD

पुणे, ता. १९ : रस्त्यातील अडथळे, अतिक्रमण दूर करा, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डेमुक्त करा, असा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला दिला. पण त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांतर्फे शहरातील तब्बल ५५० किलोमीटरचे रस्ते ‘सीसीटीव्ही’ची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणार आहे. याची सुरुवात नवी पेठेतील राजेंद्रनगरमधून झाली आहे. त्यामुळे पुणे खड्डे मुक्त कसे होणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला असून, महापालिकाही संभ्रमित झाली आहे.
पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड या भागात सीसीटीव्ही लावण्यासाठी मोठा प्रकल्प हातात घेण्यात आला आहे. हा प्रकल्प गृह विभागाने मंजूर केला आहे. यामध्ये सुमारे १६०० किलोमीटरची खोदाई होणार असून, त्यातील ५५० किलोमीटरची खोदाई ही पुणे शहरात केली जाणार आहे. महापालिकेच्या धोरणानुसार पावसाळ्यात रस्ते खोदाईचा परवानगी दिली जात नाही. ऑक्टोबर महिन्यापासून शहरात खोदाई सुरू हो शकते. पण भर पावसाळ्यातच ‘सीसीटीव्ही’ची केबल टाकण्यासाठी पहिल्या टप्प्यात २८ किलोमीटरची परवानगी दिली आहे. सध्या नवी पेठेतील राजेंद्र नगर भागात रस्ते खोदाई सुरू झाली आहे.

रस्ते दुरुस्तीचा खर्च महापालिकेवर
पुणे शहरात शासकीय विभागाने किंवा खासगी विभागाने रस्ते खोदाई केल्यानंतर रस्त्याची जबाबदारी संबंधितांवर टाकली जाते किंवा रस्ते दुरुस्तीसाठी होणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जातो. यासाठी खासगी कंपनीसाठी प्रतिमीटर १२ हजार १९२ प्रति इतके शुल्क आहे. तर शासकीय कंपन्यांना यात ५० टक्के सूट आहे. या ‘सीसीटीव्ही’च्या प्रकल्‍पात रस्ते दुरुस्तीचा खर्च पूर्णपणे महापालिकेवर टाकण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार किंवा गृह विभाग महापालिका कोणतेही शुल्क देणार नाही. त्यामुळे ५५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यास महापालिका प्रशासनाने विरोध करत सरकारकडे पत्रव्यवहार करून खर्चाची रक्कम देण्याची मागणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

खड्डेमुक्त पुणे कसे होणार?
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी खड्डे मुक्तीसाठी प्रशासनाला कामाला लावत नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. पण ५५० किलोमीटरची केबल टाकण्यासाठी शहरातील लहान मोठे रस्ते खोदले जाणार आहेत. गृह विभागाचा ठेकेदार खड्डे खोदणार आणि त्यावर माती टाकून निघून जाणार आहे. त्यानंतर रिसर्फेसिंग करण्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडणार आहे. या महापालिका व पोलिस यांच्यात समन्वय नसल्याने पुणे खड्डे मुक्त कसे होणार? वाहतूक कोंडी कमी कशी होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

आम्ही नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरात खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्नात आहोत. पण ‘सीसीटीव्ही’साठी शहरात रस्ते खोदाई केली जाणार आहे. हे रस्ते पुन्हा व्यवस्थित होणे आवश्‍यक आहे. या कामाचा खर्च महापालिकेवर टाकण्यात आला आहे. पण एवढा निधी महापालिकेकडे उपलब्ध नसल्याने नगरविकास विभागाला पत्र पाठवून निधीची मागणी केली जाणार आहे.
- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs OMN Live: भारताची विजयी हॅटट्रिक! Super 4 मध्ये रविवारी IND vs PAK सामन्याची मेजवानी; जाणून घ्या पुढील सामन्यांचे वेळापत्रक

IND vs OMN Live: हार्दिक पांड्याची मॅच विनिंग कॅच! अर्शदीप सिंगने रचला इतिहास, ओमानच्या कलीमने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

Sam Pitroda clarification : ''पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं'' म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

IND vs OMN Live: ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला का आला नाही? समोर आलं कारण...

SCROLL FOR NEXT