पुणे

डंपरची धडक बसल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

CD

पुणे, ता. २९ : भरधाव डंपरची धडक बसल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वाघोलीत घडली. या प्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
भारती प्रकाश देठे (वय ४५, रा. मिलिंद बेकरीजवळ, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी दत्तात्रेय गोरे यांनी वाघोली ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती देठे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नगर रस्त्यावरून निघाल्या होत्या. वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौकात भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने भारती यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT