पुणे

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्य सरकारची विशेष मोहीम

CD

पुणे, ता. २९ : राज्य सरकारमार्फत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तसेच बारावी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (मराठा ) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ‘सीओव्हीआयएस’ प्रणाली किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरून त्याची प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आळंदी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वेळेत सादर करावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या व अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दर बुधवारी व गुरुवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, परिपूर्ण प्रकरणात तत्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त संजय दाणे यांनी दिली.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

SCROLL FOR NEXT