पुणे

तरुणाईत रुजतेय कामाची नवी पद्धत

CD

राधिका वळसे पाटील
पुणे, ता. २८ : घरून काम करण्याची एकसुरी पद्धत आणि ऑफिसचा ताण याला पर्याय म्हणून ‘वर्क फ्रॉम कॅफे’ ही नवी संस्कृती तरुणाईत वेगाने लोकप्रिय होत आहे. लॅपटॉप, हेडफोन आणि कॉफीचा कप घेऊन कॅफेत तासन्‌तास बसून काम करणारे तरुण आता सहज दिसू लागले आहेत. वेगवान वाय-फाय, चार्जिंग पॉइंट्स, आरामदायी खुर्च्या-टेबल्स आणि शांत परिसर या सुविधा देऊन अनेक ‘कॅफे’ तरुणांसाठी आदर्श कार्यस्थळ झाले आहे.
‘वर्क फ्रॉम कॅफे’ ही नवी कार्यसंस्कृती झपाट्याने आकार घेत आहे. ‘कुठूनही काम करा’ ही कल्पना तरुणाईने स्वीकारली आहे. त्यामुळे कॅफे फक्त भेटीगाठींचे ठिकाण राहिलेले नाही, तर काम आणि सर्जनशीलतेसाठी नवे ठिकाण बनले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात ‘को-वर्किंग कॅफे’ सुरू झाले आहेत. फ्रीलांसर, स्टार्टअप्स, आयटी, डिझाईनिंग, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीतील तरुण या संस्कृतीकडे आकर्षित झाले आहेत. लेखक आणि आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी हा एक आकर्षक पर्याय बनला आहे. तसेच, कॅफेतून काम करणे, हे समाज माध्यमावर दाखवण्याजोगे ‘कूल फॅक्टर’ ठरते. त्यासोबतच कॅफेची ब्रँड मूल्य हे वाढत असून, ‘वर्क-फ्रेंडली कॅफे’ म्हणून त्याची वेगळी ओळख निर्माण होते. हे कॅफे शहरातील बाणेर, बावधन, कोथरूड, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, सेनापती बापट रस्ता, औंध, बालेवाडी, कोरेगाव पार्क, विमाननगर या भागात आहेत.
दरम्यान, ‘वर्क फ्रॉम कॅफे’ संस्कृतीमुळे दिवसभर ग्राहकांचा रेंगाळत वावर राहतो. लांब वेळ बसल्याने इतर ग्राहकांना जागा मिळत नाही, तर ‘वाय-फाय’वर ताण येतो. त्यामुळे काही कॅफेत किमान ऑर्डर किंवा प्रतितास शुल्क अशा अटी लागू केल्या जात आहेत.

मिळणाऱ्या सुविधा
- जलद, मोफत इंटरनेट असलेले वाय-फाय कनेक्शन
- लॅपटॉप, मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर सॉकेट्स/चार्जिंग पॉइंट्स
- सोफे, खुर्च्या, को-वर्किंग टेबल्स असे आरामदायी आसन व्यवस्था
- शांत, म्युझिक, नैसर्गिक प्रकाश किंवा डिम लाइट असलेले वातावरण
- कॉफी, स्मूदी, सँडविचेस किंवा हलके खाणे
- काही कॅफे ‘डे पास’ किंवा ‘सबस्क्रिप्शन पॅकेज’ देऊन दिवसभर बसण्याची मुभा देतात.

तरुणाईला का आवडते?
घरातल्या चार भिंतीत काम करण्यापेक्षा कॅफेचे उत्साही वातावरण जास्त प्रेरणा देणारे वाटते. आसपासची लोकांची हालचाल, हलके संगीत आणि उबदार कॉफीमुळे कामात एक वेगळी ऊर्जा मिळते. तेथे असणाऱ्या ऊर्जेने परिपूर्ण वातावरण, इतर फ्रीलांसर, उद्योजक, क्रिएटिव्ह लोक भेटतात, ज्यामुळे नेटवर्किंग वाढते. वातावरण बदलल्याने लक्ष केंद्रित होते. कामाची उत्पादनक्षमता वाढते. कार्यालयीन वेळेचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नसते, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठूनही काम करू शकता.

कॅफेत काम करताना उत्पादनक्षमता वाढते, घरात एकटेपणात काम करण्यापेक्षा कॅफेचे जिवंत वातावरण लक्ष केंद्रित ठेवते, तसेच नेटवर्किंगच्याही संधी मिळतात आणि कामाचाही ताण येत नाही.
- सुदर्शन येनपुरे, नोकरदार, आयटी कंपनी

सध्याची कार्यसंस्कृती पूर्णपणे बदलली आहे. अधिकाधिक तरुण कॅफेमध्ये बसून काम करण्यास प्राधान्य देत आहेत, ज्यामध्ये बहुतेक आयटी क्षेत्रातील ग्राहक आणि फ्रीलांसर, चित्रकार, पुस्तक लेखक आदी क्षेत्रातील ग्राहकांचा समावेश आहे. बहुतेक कॅफेमध्ये किमान ऑर्डर किंवा तासाभराचे शुल्क असते. यामध्ये गेमिंग झोन, इनडोअर गेम्स, वाचन क्षेत्रे इत्यादींचा देखील समावेश आहे.
- पृथ्वीराज बराटे, कॅफे व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

SCROLL FOR NEXT