पुणे

पुण्यात आज संघ शक्तीचे दर्शन

CD

पुणे, ता. १ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला उद्या (ता. २) दसऱ्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्ष आरंभानिमित्त पुणे महानगरात संघ शक्तीचे सादरीकरण होणार आहे. त्या अंतर्गत शहराच्या विविध भागांतून ७७ पथसंचलने आणि ८४ उत्सव होणार आहेत. त्यात २० हजारांहून अधिक स्वयंसेवक गणवेशात सहभागी होणार आहेत.
पुणे महानगरातील नऊ भागांमध्ये एकूण ८४ शस्त्रपूजन उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. संघ स्वयंसेवकांची एकूण ७७ सघोष पथ संचलने पुणे शहराच्या विविध भागांतून काढली जातील. या उत्सवांमध्ये बाल वयोगटातील स्वयंसेवकांचा सहभाग लक्षणीय असून, त्यांच्यासाठी २० संचलने आणि २७ शस्त्रपूजन उत्सवांचाही समावेश आहे. बाल गटाचे हे उत्सव आठवडाभरात पार पडतील. यंदा संघाने पथसंचलनासोबतच शस्त्रपूजन उत्सवांवर अधिक भर दिला आहे. या उत्सवांमध्ये जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत कार्यरत असलेले संघ स्वयंसेवक सहभागी होत आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या उत्सवांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामुळे संघाचे कार्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहचेल. शताब्दी वर्षानिमित्त मोठा समाज जोडण्याचा संघाचा प्रयत्न आहे.

शताब्दीनिमित्त मुख्य उद्दिष्ट
- शताब्दी वर्षादरम्यान संघ ‘पंच परिवर्तन अभियान’ राबविणार आहे. ज्यात पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, स्व-आधारित व्यवस्था, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या पाच बिंदूंना घेऊन संघ समाजात जाणार
- देशभरातील प्रत्येक मंडळ आणि वस्तीपर्यंत पोहोचून सध्याच्या ६८,००० हून अधिक असलेल्या शाखांची संख्या एक लाखापर्यंत वाढविण्याचे संघाचे उद्दिष्ट
- प्रत्येक गावात संघ स्वयंसेवक गृह संवाद अभियान राबवीत राष्ट्रीय विचार आणि संघाची भूमिका पोचविण्याचा प्रयत्न करणार
- सामाजिक समरसतेसाठी सर्व मंडळे आणि वस्त्यांमध्ये हिंदू संमेलने आयोजित करणार
- राष्ट्रीय विकास आणि ‘पंच परिवर्तन’मध्ये प्रत्येकाचा सहभाग असण्याचा संदेश दिला जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT