पुणे

विद्यार्थी सहायक समितीचा माहेर मेळावा उत्साहात

CD

पुणे, ता. १ : विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थिनींचा माहेर मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्याला विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे, सचिव मनीषा गोसावी, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त विनया ठोंबरे, अलकनंदा चौधरी (पाटील) उपस्थित होते. मंडळाचे उपक्रम, पुढील दिशा, उद्दिष्टांबद्दलची आणि भूमिका याबद्दलची माहिती काळे यांनी दिली. मेळाव्यामागील भूमिका गोसावी यांनी नमूद केली. रंजनकर यांनी समितीविषयीचे अनुभव, येणाऱ्या अडचणी, आगामी उपक्रम याबद्दल मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थिनी जान्हवी जोगळेकर यांनी समितीमधील एका विद्यार्थिनीचा उद्योजक बनण्याचा प्रवास सांगितला. परिसंवाद आणि सत्कार सोहळ्याचे निवेदन अनिता देशपांडे आणि ॲड. प्रार्थना सदावर्ते यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी वेगळे काम करणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. माधुरी नाईक यांनी मुलींसाठी चार सायकलींसाठी आर्थिक मदत जाहीर केली.
मेळाव्याला समितीचे विश्वस्त तुकाराम गायकवाड, माजी विश्वस्त सुप्रिया केळवकर, माजी पर्यवेक्षिका उज्वला माटे, मंडळाचे खजिनदार ॲड. देविदास टिळे, मनोज गायकवाड, प्रभाकर पाटील, निसार चौगुले, जिभाऊ शेवाळे, संभाजी सातपुते, डॉ. अभय व्यवहारे, डॉ. प्रसाद आंबीकर, शंकर बारवे, सुनील चोरे उपस्थित होते. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता पाटील यांनी आभार केले.

फोटोः 56698

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : जर्मनीतील भारतीयांनी भारतातील तरुणांच्या कौशल्याला संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

Maharashtra Weather : थंडीची चाहूल नाहीच! महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हीट'चा जोर वाढला, 'या' शहरांमध्ये तापमान ३५ अंशांच्या पार

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

Nanded News : नवी दिल्लीतील 'ESTIC 2026' राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड!

LA 2028 OLYMPICS CRICKET SCHEDULE: लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने कधी होणार? पात्रता फेरीच्या तारखाही आल्या समोर

SCROLL FOR NEXT