पुणे

रस्त्यातील अडथळे हटवण्यासाठी पालिका-महावितरणची समिती

CD

पुणे, ता. १ ः शहरातील प्रमुख रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आणि महावितरणची समिती स्थापन केली जाणार आहे. या माध्यमातून विजेचे खांब, डीपी यासह अन्य अडथळ्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष काम केले जाणार आहे.
शहरातील ३२ रस्ते आणि २० चौकांमधील वाहतूक सुधारणा करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस, महावितरण यासह अन्य शासकीय विभाग संयुक्तपणे काम करणार आहेत. महापालिकेच्या अभियंत्यांनी या रस्त्यांचे व चौकांचे सर्वेक्षण करून अडथळे काय आहेत, याचा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर आता महापालिकेने महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यात अडथळा ठरणारे खांब, फिडर पिलर हटविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे.  
महापालिकेने केलेल्या अहवालानुसार काही चौकात, पदपथांवर महावितरणचे विद्युत खांब, फिडर पिलर आहेत. काही ठिकाणी विद्युत वाहिनी बाहेर आलेल्या आहेत. यावर बैठकीत चर्चा झाली आहे. महापालिकेचे व महावितरणचे अधिकारी या अडथळ्यांची आणि प्रत्यक्ष पाहणी करून ते कुठे हलविणे शक्य आहेत, त्यावर अन्य उपाययोजना काय करता येईल याचा निर्णय घेणार आहेत. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार पदपथांवर सुमारे ७० हजार पिलर आहे. ते बाजूला करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. वाहतुकीला अडथळा ठरणारे हे खांब, फिडर पिलर स्थलांतरित केले जातील, असे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: १,४३४ दिवसानंतर विकेट! भुवनेश्वर कुमारची कमाल, पण अर्शदीप सिंगचा मोठा विक्रम! टीम इंडियाचाही पराक्रम

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT