पुणे

सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत उद्धव ठाकरे यांची अपेक्षा ः भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

CD

पुणे, ता. ४ ः ‘‘लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्‍न विचारू शकत होते, तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्‍न विचारायचे नाहीत का? तो अधिकार आपण गमावून बसलो आहोत का? पत्रकारांनी सरकारला निःपक्षपातीपणे प्रश्‍न विचारून, आपले कर्तव्य बजावले पाहिजे.’’ अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार भवन येथे ठाकरे यांच्याशी वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘सोनम वांगचुक हे नरेंद्र मोदी यांची स्तुती करत होते, तेव्हा ते देशप्रेमी होते. मात्र, आता त्यांनी असा काय गुन्हा केला की त्यांना थेट राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी लागली. वांगचुक यांनी चूक केली होती, मग मणिपूर का पेटले? लडाख, आसाम शांत झाले आहे का ? आपल्याकडे देशात काय चालले आहे, याच्या बातम्याच येत नाहीत. मग खरोखरच आपण टिळक-आगरकरांचे नाव घ्यावे का ?’’
शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपसोबत असताना आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो, भाजपला सोडले की हिंदुत्व गेले असे होते का ? ‘आरएसएस’साठी अनेकांनी कष्ट केले, पण आता त्याला विषारी फळे लागली, हे तुमचे फलित आहे का ? मोहन भागवत मशिदीत जातात. भाजप अल्पसंख्यकांना सदस्य करून घेते, मात्र आम्ही कॉंग्रेसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, अशी टीका केली जाते. पहलगाममधील हल्ल्यानंतर ज्यांनी हिंदूंना मारले, त्या पाकिस्तानसमवेत तुम्ही क्रिकेट कसे खेळता ? आम्ही हिंदुत्व सोडले, मग चंद्राबाबू नायडू, नीतिशकुमार हे हिंदुत्ववादी आहेत का? मोदींनी ३५ लाख मुस्लिम लोकांना सौगात वाटली, मग भाजप हिंदुत्ववादी आहे का ? म्हणजे भाजप करेल ते ‘अमर प्रेम’ आणि इतर करतील ते ‘लव्ह जिहाद’.’’
---------------------
..तर तिन्ही पक्ष एकत्र लढतील
लोकसभा व विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तिन्ही पक्षांनी आघाडी म्हणून लढण्यात हरकत नाही. तिन्ही पक्षांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात, ज्यांना वाटेल वेगळे लढायचे आहे, ते वेगळे लढू शकतात. निवडणूक जाहीर होतील, तेव्हा चर्चा होईल. त्यासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा केली जाईल, असेही ठाकरे म्हणाले.
-- ------------
ठाकरे म्हणाले,
- शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा निवडणूक आयुक्तांचा जन्मही नसेल
़ ठाकरे ब्रॅण्ड पुण्याचा, पुणेकरांनी ठरविले तर पुण्यात ताकदीने उतरू
- पूर्वी युतीमुळे पुण्याकडे दुर्लक्ष केले, पण आता पुण्यात लक्ष घालू
- मराठीच्या मुद्यावर आम्ही एकत्र आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले
- भाजपला केंद्रातील व राज्यातील सरकार चालवता येत नाही.
- देशाला पंतप्रधान व गृहमंत्र्यांची गरज, सध्याचे फक्त पक्षाचे मंत्री
- कर्जमुक्ती, नुकसानभरपाई, शिक्षण, नोकऱ्या हे भावनिक की जीवनावश्‍यक प्रश्‍न
---------------
फोटो ः 57183, 57184

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT