पुणे

‘आजची द्रौपदी दुर्बलतेकडून सबलतेकडे जाणारी’ ः डॉ. रघुनाथ माशेलकर

CD

आजची द्रौपदी दुर्बलतेकडून
सबलतेकडे जाणारी
डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन

पुणे, ता. १२ ः द्रौपदी ही स्वयंभू, स्थितप्रज्ञ, कुशल, बुद्धिमान, प्रगल्भ, सहनशीलता आदी गुण दर्शविणारी महानायिका आहे. आजची द्रौपदी अन्यायाकडून न्यायाकडे जाणारी, दुर्बलतेकडून सबलतेकडे जाणारी आहे, असे मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी व्यक्त केले.
आडकर फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ लिखित ‌‘द्रौपदी - काल, आज, उद्या‌’ या कादंबरीच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रघुनाथ माशेलकर यांच्या पत्नी वैशाली माशेलकर, रंगकर्मी संजीवनी समेळ, अमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, अभिनेते संग्राम समेळ, आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘समेळ यांच्या या साहित्यकृतीच्या मागे प्रचंड संशोधन, मेहनत आहे. ही साहित्यकृती वाचकांना सामाजिक संदेश देत समाजाला घडवू शकण्याचे सामर्थ्य असणारी आहे. आजची द्रौपदी राष्ट्रपती भवन, अंतराळ, रणांगण अशा सर्व ठिकाणी ठामपणे अस्तित्व दर्शवित आहे. अवकाशात एकटे राहणे, हे आधुनिक द्रौपदीचे रूप आहे.’’

अशोक समेळ म्हणाले, ‘‘महाभारताच्या आधीची द्रौपदी, वस्त्रहरणानंतर पांडवांचे षंढत्व नाकारणारी द्रौपदी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांना चेतवत राहिलेली द्रौपदी, ही समाजात पतीव्रता म्हणून ओळखली जाते. तिच्यातील अनेक गुण आजच्या स्त्रियांमध्ये देखील आहेत, याविषयी देखील या कादंबरीत भाष्य केले आहे.’’
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात संजीवनी समेळ, श्रद्धा समेळ आणि संग्राम समेळ यांनी ‌कादंबरीतील प्रसंगांचे अभिवाचन केले.
फोटोः 59544

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT