पुणे, ता. २८ : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चंदुकाका सराफमध्ये दागिने खरेदी करणे ग्राहकांना लाभदायक ठरणार आहे. रविवारी (ता. ३०) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३० हजार व पुढील रकमेचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक ज्युपिटर दुचाकी प्रति स्टोअरमध्ये जिंकण्याची संधी मिळणार आहे, ही सवलत केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे रविवारीच लागू राहणार आहे. तसेच मुहूर्ताच्या खरेदीसाठी सोन्याच्या दरामध्ये देखील खास सवलत दिली आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना किमान १०१ रुपये प्रति ग्रॅम सूट मिळणार आहे. तसेच सात लाख रुपये व पुढील सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर १५१ रुपये प्रती ग्रॅम सूट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. चंदुकाका सराफ यांच्या सर्व स्टोअर्समध्ये हे लाभ ग्राहकांना मिळतील.
विवाह समारंभासाठी खास ‘विवाह तस्मै'' हे नवीन वेडिंग ज्वेलरी कलेक्शन देखील सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेव्हा शुभ मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी आणि दुचाकी जिंकण्यासाठी आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ स्टोअरला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन चंदुकाका सराफचे अध्यक्ष किशोरकुमार शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.