पुणे

महावितरण सोमवारपर्यंत कार्यालये सुरू ठेवणार

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : पुणे परिमंडलातील थकबाकीचा आकडा ८३ कोटी रुपयांच्या घरात असल्यामुळे महावितरणने शनिवारपासून सोमवारपर्यंत (२९ ते ३१ मार्च) सर्व अधिकृत वीज देयक भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात निर्णय घेतला आहे.
सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांकडे ८२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही देयक भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. गेल्या २७ दिवसांत ही कारवाई झाली आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने देयक भरावे. लघुदाब ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या ऑनलाइन भरणा करू शकतात, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
---
वीजपुरवठा खंडित
विभाग ः ग्राहक
पुणे शहर ः १३,२२२
पिंपरी-चिंचवड ः १०,८२०
ग्रामीण ः ९,२८७
एकूण ः ३३,३२९
---
थकबाकी
पुणे शहर ः ३६ कोटी ८६ लाख
पिंपरी-चिंचवड ः १८ कोटी ६५ लाख
ग्रामीण ः २७ कोटी ४८ लाख
----------------
वीजग्राहकांच्या माहितीसाठी
- तत्पर भरणा सवलत (प्रॉम्ट पेमेंट डिस्काउंट) ः देयकाच्या तारखेपासून सात दिवसांत भरणा केल्यास एक टक्का (तारीख देयकात नमूद असते)
- ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के सवलत ः क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे भरणा (५०० रुपयांच्या मर्यादेत)
- थकबाकीवरील व्याज ः देय तारखेपासून असलेली थकबाकी ६० ते ९० दिवसांत भरल्यास १२ टक्के, ९० दिवसांनी भरल्यास १५ टक्के
- विलंब शुल्क आकारणी ः १.२५ टक्के
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT