पुणे

प्रत्येक देशी गाईमागे पन्नास रुपयांचे अनुदान

CD

पुणे, ता. २८ : देशी गाईंची उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. अशा गाईंना गोशाळेत ठेवले जाते. या गोशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तेथील गाईंना प्रतिदिन ५० रुपये अनुदान देण्यात येईल. त्यासाठी शासनाने गोवंश परिपोषण ही योजना राबवली आहे.
या अंतर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गाईंसाठी २५ कोटी ४५ लाख ६६ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अभियानासाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, संतकुमार गुप्ता, मनीष वर्मा, परेश शाह, दीपक भगत, सदस्य सचिव डॉ. मंजूषा पुंडलिक यांनी विशेष प्रयत्न केले.
मुंदडा म्हणाले, ‘‘या योजनेचे श्रेय फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आहे. आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळेतील गाईंसाठी अनुदान दिले जात आहे. देशी गोवंश संवर्धन काळाची गरज असून त्यामुळे ग्रामीण विकास गतिमान होण्यास चालना मिळेल.’’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Mango City: फळांच्या राजाचं 'हे' आहे माहेरघर! 'मँगो सिटी'चा आंबा थेट रशिया-अमेरिकेपर्यंत फेमस कसा झाला? वाचा

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालमधील १४ केंद्रांवर आज फेरमतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT