स्वागत दिवाळी अंकाचे
-----------------
१) निर्मळ रानवारा
कल्पनाशक्ती, संस्कार आणि ज्ञानाचा मिलाफ असलेला ‘निर्मळ रानवारा’ हा दिवाळी अंक लहान मुलांसाठी एक वेगळीच आनंदयात्रा घेऊन येतो. हा अंक म्हणजे मुलांच्या मनातील निष्पाप कल्पनाशक्तीला आकार देणारा, आणि चांगल्या मूल्यांचे बीज पेरणारा एक सुंदर प्रयत्न असून यंदा अंकाने ‘रंग’ हा विषय निवडला आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी, कविता आणि कोडी त्याभोवती रेंगाळताना दिसतात.
या अंकात ५० हून अधिक काल्पनिक व वास्तवाशी नातं सांगणाऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत. ज्या प्रत्येक गोष्ट मुलांना काहीतरी शिकवते.
गौरी गाडेकर, डॉ. संगीता बर्वे, धनंजय उपासनी, सुरेश वांदिले, साईनाथ पाचारणे, ल. म. कडू, रश्मी कुलकर्णी, एकनाथ आव्हाड, उत्तम सदाकाळ, पूनम छत्रे, रवींद्र चालिकवार, वासंती काळे, शारदा शिंत्रे, श्रीपाद कुलकर्णी, उज्जवला केळकर, प्रा. वंदना चक्रवती, वंदना लोखंडे, दीपा शहा, शुभांगी कुलकर्णी, शैलजा जोशी आदींचे लेख आहेत.
मुख्य संपादक ः ज्योती जोशी, पाने ः १४४, किंमत ः ४० रुपये
--------------
२) शिवतेज
यंदाच्या अंकातील कथा आपल्या आजूबाजूच्या जीवनाशी घट्ट जोडलेल्या आहेत. निरंतर प्रेमाचा शोध- अजित कारखानीस, मला आई व्हायचंय- संतोष जाधव, शर्यत- उत्तम सदाकाळ, काळजाचा तुकडा- अविनाश भोंडवे, बंगाली काळी जादू- एकनाथ गायकवाड, गजरा- अरुण सावळेकर, आर्यनची गोष्ट- प्रिया फुलंब्रीकर, शेजारधर्म - भारती सावंत आदींच्या कथांमधून माणुसकीचा उबदार स्पर्श जाणवतो.
दिलीप कुकडे, गुरुप्रसाद पणदूरकर, डॉ. प्रकाश जाधव, विठ्ठल कदम, उद्धव भयवाळ, आनंद देशमुख, प्रा. भरत खैरकर, आसावरी ऐनापुरे, नागेश शेवाळकर, डॉ. पूजा सामंत आदींचे लेख अंकात आहेत. प्रा. देवबा पाटील, अविनाश खरे, तुकाराम खिल्लारे, नलिनी भोसेकर, प्रिया फुलंब्रीकर, वर्षा झांबरे, रामचंद्र पाचूणकर आदींच्या कविता आहेत.
कार्यकारी संपादक : केतन सुर्वे, पाने : १७६, किंमत : २५० रुपये
------------------------------------------------------------------
३) शालिमार
विविध विषयांवरील लेख, आशयघन कवितांनी यंदाचा अंक सजला आहे. कवी केशवसुत यांच्या स्मारकावर हेमंत पाळेकर यांनी लेख लिहिला आहे. मगरींच्या सावटातील संध्याकाळ या विषयावर गजानन देवधर यांनी लिहिले आहे. जयंत भिडे यांनी आपला काव्यप्रवास उलगडला आहे. सुभाषचंद्र जाधव, दिलीप अपशंकर, ज्योती कुंटे, अरुण निसरगंड, स्वाती दाढे, स्मिता दामले- कुलकर्णी, प्रकाश पागनीस, राधिका कुलकर्णी, सुरेश पोरे आदींनी विविध विषयांवर लिहिले आहे. अनघा असलेकर, तन्वी भोपळे, नीला पाटणकर, डॉ. विजय भंडारे, विवेक सबनीस आदींच्या कविता आहेत.
संपादक ः मनोहर सप्रे, पाने ः ८०, किंमत ः १७५ रुपये
४) आपला
कौटुंबिक विषयाला हा अंक वाहिलेला आहे. अंकाच्या सुरवातीस गौरी बनसुडे यांचा लेख आहे. ‘बाई... काय हो हे!’ हा विभावरी कारले यांचा लेख, ‘युरोप! खरा आणि सिनेमातला’ राजीव कन्नल यांचा लेख वाचावयास मिळतो. याशिवाय राजीव नातू, आद्या कन्नल, मल्हार बनसुडे, पलाश भाडदिया, मनीषा अस्पत, राजीव कन्नल, गिरिजा भाडदिया, इंद्रजित कारले, दीपक कन्नल, नियती कन्नल, अमेय कन्नल, उमा कन्नल, अभिषेक कन्नल, इंद्रजित कन्नल यांचे लिखाण अंकामध्ये आहे. या अंकात मराठी आणि इंग्रजी भाषेतील लिखाण आहे. याशिवाय लहान मुलांची चित्रकृती पहावयास मिळते. त्यामध्ये ईरा कन्नल, काव्या जोग, आरव कन्नल आदींची चित्रे आहेत.
संपादक : दीपक कन्नल
पाने : १३६
-----------------
५) भूमिका
मराठी भाषा गौरव या विशेष विभागासह व्यक्तिविशेष, कथा, कविता, बालसाहित्य, प्रवासवर्णन, पुस्तकपरीक्षण आदी भरगच्च
मजकूर अंकात आहे. डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. केशव देशमुख, डॉ. प्रताप गायकवाड, प्रा. विजय लोंढे, बाळकृष्ण बाचल, नितीन शिंदे, राहुल भोसले आदींनी मराठी भाषेचा गौरव यावर लेखन केले आहे. अरविंद सुर्वे, अनिल शिंदे, प्रदीप गांधलीकर, मधुकर मोकाशी, भाग्यश्री बोरकर, काशिनाथ आल्हाट आदींनी व्यक्तिदर्शन घडवले आहे. राधिका भांडारकर, डॉ. सागर देशपांडे आदींनी ललितलेखन केले आहे. अंजली श्रीवास्तव, शरद थोरात, राम लोखंडे, नंदू लांडगे, अरुण सावळेकर आदींच्या कथा आहेत. एकनाथ आव्हाड, संजय ऐलवाड, डॉ. सुरेश सावंत, स्वप्ना अमृतकर, जया पाटील आदींनी लहान मुलांचे विश्व उलगडले आहे. भारत सावंत, शिवाजी चाळक, किशोर मोगल, अमिताभ आर्य, कविता जाधव, नीलकंठ मराठे, शुभदा अवचिते, प्रभा सोनवणे, सतीश लोथे, अरुण कटारे, सचिन बेंडभर, तुकाराम खिल्लारे आदींच्या कविता आहेत.
संपादक ः प्रा. रूपाली अवचरे, पाने ः १५४, किंमत ः २३० रुपये
------------------------------
६) मराठबोली
भक्तिमय आणि मातीशी जोडलेला अंक म्हणजे मराठबोली दिवाळी अंक. या अंकात महाराष्ट्रातील भक्ती, संस्कृती, निसर्ग आणि माणुसकीचा संगम आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि मानवी संवेदनांचा एकत्रित साठा आहे. या अंकातून केवळ लेखन नव्हे, तर मातीचा गंध, वारकऱ्यांच्या ओव्या आणि श्रद्धेचा श्वास अनुभवायला मिळतो. पंढरीची वारी, वारकरी संप्रदाय आणि त्यामागची भक्तीभावना हा या अंकाचा मूळ गाभा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ग्रामसंस्कृती, शेती, आणि माणसामाणसांतील नाती यांचा संवेदनशील आढावा घेतला आहे.
प्रदीप निफाडकर, शरद अत्रे, श्रीपाद टेंबे, साहेबराव पवळे, हेमंत परबस रमण रणदिवे, कुसूम बोते, जयंत कोपर्डेकर, सुनीता जोशी, नेहा कुळकर्णी, कीर्ती जाधव, ज्ञानोबा गायकवाड, सचिन कुरकुटे, काशिनाथ भारंबे, साधना गाढवे, हेमलता चौधरी, भाऊसाहेब आढाव आदींनी यात लेखन केले आहे.
संपादक - परमेश्वर उमरदंड, पाने ः ११२
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.