पुणे

स्वागत दिवाळी अंकांचे

CD

१) अक्षरमुद्रा
प्रवासवर्णन, मुलाखत, व्यक्तिविशेष, ललित, कथा, कविता आदी विभाग अंकात आहेत. उषा प्रभुणे यांचा ‘ग्रीस : पुराणेतिहास आणि निसर्गसौंदर्य’ यावरील लेखाची भट्टी जमली आहे. प्रा. दत्ता भगत यांची मुलाखत आहे. प्रा. मीनल येवले, प्रा. विश्‍वास वसेकर, रवींद्र लाखे, संजीवनी बोकील, डॉ. अनिल जोशी, केशव देशमुख, सविता कुरुंदवाड, प्रा. सुजाता राऊत, दीप्ती कुलकर्णी, समीर दळवी, राजेश हेन्दे यांचे ललित लिखाण आहे. सुनीता दिक्कतवार, मधुकर धर्मापूरकर, भारती सावंत, शिरीष जुगारे, शंकर विभुते, वृंदा दिवाण यांच्या विविध विषयावरील कथा आहेत. पी. विठ्ठल, अनुपमा उजगरे, ललिता गादगे, आसावरी काकडे, विद्या कुलकर्णी, डॉ. स्मिता पाटील, डॉ. सीमा ढगे यांच्या कविता आहेत.
संपादक : दीपक चिद्दरवार, पाने : २९४, किंमत : ३०० रुपये

२) ‘कमांडर’
यंदाचा अंक ‘युद्धपट विशेषांक’ आहे. हिंदी, मराठी आणि हॉलिवूडमधील सुमारे ४८ युद्धावर आधारित चित्रपटांवरील लेख यात आहेत. ‘हकिकत’, ‘बॉर्डर’, ‘कर्मा’, ‘क्रांती’ ‘शेरशाह’पासून ते ‘लायन ऑफ द डेझर्ट’पर्यंतच्या क्लासिक्सचा समावेश आहे. तसेच ‘छोटा जवान’, ‘शेवटचा मालुसरा’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘शहीद राजगुरू'' या मराठी युद्धपट/देशभक्तिपर चित्रपटांवरील लेख अंकाला समृद्ध करतात. विषयवैविध्य, माहितीपूर्ण लेखन आणि सर्जनशील मांडणीमुळे हा अंक संग्राह्य ठरतो.
संपादक : डॉ. राजू पाटोदकर, प्रा. डॉ. संजय पाटील-देवळाणकर, पाने : १९२, किंमत : ३०० रुपये
फोटो ः ६३१४४

३) साहित्यदीप
यंदा ‘विनोद’ या विषयाला हा दिवाळी अंक वाहिलेला आहे. विनोदाच्या विविध पैलूंवर मान्यवर लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. विनोदी चित्रपट, विनोदी मालिका रसिकांना खूप आवडतात. ‘चला हवा येऊ द्या’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या मालिकांचा खास रसिक वर्ग आहे. विनोदाची मराठी साहित्यात निर्मिती कधी झाली, हे अंकाच्या माध्यमातून उलगडले आहे. सुनीताराजे पवार यांचा अभ्यासपूर्ण लेख, तसेच इतर साहित्यिकांचे दर्जेदार लेख, कथा, कविता आणि चित्रकला या सर्वांनी हा अंक अधिक देखणा झाला आहे. गीता राऊत यांचे कलात्मक मुखपृष्ठ आणि शरद तरडे यांच्या चित्र-काव्य विभागाने या अंकाचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
संपादक : ज्योत्स्ना चांदगुडे, पाने : ९६, किंमत : १५० रुपये
----------------------------
४) विपुलश्री
विविध विषयांवरील कथा, लेख, मुलाखतींचा समावेश अंकात आहे. अंकाच्या प्रारंभी प्रा. प्रवीण दवणे यांचा ‘बहिणाबाईंचे पाऊस आणि उगवती माती यांचे अभंग’ हा लेख आहे. याशिवाय मंगला गोडबोले यांचा ‘खाद्य वाटेचा मागोवा’ लेख आहे. डॉ. लिली जोशी, योगिनी वेंगुर्लेकर, डॉ. अश्‍विनी धोंगडे, डॉ. विजया फडणीस, दीपाली दातार, आशुतोष उकिडवे यांचे लेखही अंकामध्ये आहेत. माधवी कुंटे,
अर्चना अकलूजकर, अक्षय वाटवे, अपर्णा देशपांडे, नीलिमा बोरवणकर, डॉ. शिरीन वळवडे, मृणालिनी चितळे यांच्या कथा आहेत. याशिवाय कीटकांविषयी जनजागृती करणाऱ्या दोन संस्थांच्या उपक्रमाची माहिती देणारा शुभदा चंद्रचूड यांचा लेख आहे.
संपादक : माधुरी वैद्य, पाने : १८८, किंमत ः ३५० रुपये
------------
५) पवनेचा प्रवाह
वैचारिक लेख, ऐतिहासिक, निसर्ग, आदरणीय व्यक्ती, वैचारिक प्रबोधनपर कथा, आरोग्य विषयक लेख, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सांप्रदायिक माहितीचा फराळ अंकात आहे. राज अहिरराव, सुनीलकुमार सरनाईक, सुभाष वारे, तानाजी एकोंडे, गायत्री कळंबे आदींच्या लेखांचा अंकात समावेश आहे. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भारत इतिहास संशोधक मंडळ, सांप्रदायिक गाव- टाळगाव चिखली, आदर्श शाळा- गायत्री इंग्लिश स्कूल, मोशी आदींवरील माहितीपर लेखही अंकात आहेत. कथांबरोबरच आरोग्यविषयक लेखही आहेत.
संपादिका ः सुमन शिर्के, पाने ः ८०, किंमत ः २१० रुपये

६) आॅल द बेस्ट

संपूर्णपणे विनोदाला वाहिलेल्या या अंकात कथा, हास्यचित्रे, वात्रटिका असा भरगच्च मजकूर आहे. सुधीर सुखठणकर, सुभाष सुंठणकर, डॉ. विजया वाड, विवेक मेहेत्रे, अनिल हर्डीकर, प्रा. सुहास बारटक्के, डॉ. र. म. शेजवलकर, अशोक चिटणीस, संजीव पाध्ये, सदानंद चांदेकर, प्रा. रेखा नाबर आदींच्या कथांनी अंक सजला आहे. त्याचबरोबर प्रभाकर झळके, यशवंत सरदेसाई, श्रीकांत धोंगडे, कंदीकटला, वैजनाथ दुलंगे, जयवंत काकडे, सुरेश क्षीरसागर आदींची हास्यचित्रे आहेत. अनंत मेढेकर, मनोहर शुक्ल, प्रकाश पोळ, जयवंत गुजर, संजय घाटे, ह. शि. खरात, गिरीश काळे आदींच्या कविता व वात्रटिका आहेत.
संपादक ः विवेक मेहेत्रे, पाने ः ११६, किंमत ः २०० रुपये.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Kalyan: कुटूंब मजुरीसाठी आले, राहायला जागा नसल्यानं स्टेशनवर झोपले, पण तेवढ्यात चिमूल्यासोबत नको ते घडलं अन्...

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : स्थानिक निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार? निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

SCROLL FOR NEXT