

baby kidnapped at Kalyan Railway station
ESakal
कल्याण : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून मुंबई उपनगर जिल्ह्यात आणखी एक घटना घडली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवरून एका लहान बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.