पुणे

‘सकाळ-पेटोपिया’ला प्राणीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद - हजारो प्राणीप्रेमींनी दिली प्रदर्शनाला भेट

CD

पुणे, ता. २ : गोंडस पाळीव श्‍वानांच्या शेपटी हलवत स्वागत करणाऱ्या मुद्रांपासून ते रंगीबेरंगी पोपटांच्या चिवचिवाटापर्यंत आणि इग्वानाच्या हटके पोझपासून ते मुलांच्या आनंदी आरोळ्यांपर्यंत कर्वेनगर परिसरातील महालक्ष्मी लॉन्स आनंद, उत्साह आणि निरागस प्रेमाने उजळून निघाला. ‘आर्यन वर्ल्ड स्कूल’ प्रस्तुत ‘सकाळ-पेटोपिया’ या उपक्रमात हजारो नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसह सहभाग नोंदवत, माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमळ नात्याचं अप्रतिम दर्शन घडविले. प्रत्येक स्टॉल, प्रत्येक पाळीव प्राणी आणि प्रत्येक मुलाचं हसू या उपक्रमाला जिवंतपणा देत होता. रविवारी या प्रदर्शनाचा मोठ्या उत्साहात समारोप झाला.
रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच महालक्ष्मी लॉन्स गजबजून गेला होता. शाळेला सुट्टी असल्याने लहान मुलांनी आपल्या पाळीव प्राण्यांसह हजेरी लावली होती. कोणाच्या कुशीत मांजर, तर कोणाच्या हातात श्‍वान; कोणाच्या शेजारी चालत होता ‘ब्रुनो’, तर कोणाच्या खांद्यावर बसलेला होता ‘स्कारलेट’. विविध जातींचे श्‍वान, रंगीबेरंगी मासे, आकर्षक पक्षी आणि इतर प्राणी पाहण्यासाठी मुलांसह पालकांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

मनोरंजनासोबत सर्जनशीलता
‘सकाळ-पेटोपिया’ प्रदर्शन समारोपाच्या दिवशी मनोरंजनासोबतच सर्जनशीलताही दिसली. लहान मुलांसाठी या प्रदर्शनात विशेष ओरिगामी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात चिमुकल्यांनी कागदाच्या मदतीने छोट्या-छोट्या आणि कलात्मक वस्तू तयार करण्याचा आनंद घेतला.

‘डॉग शो’ने लहानग्यांची जिंकली मने
‘रेल्वे प्रोटेक्शन फोर्स’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉग शो’ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रेल्वे संरक्षण दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा, सहाय्यक सुरक्षा आयुक्त प्रबीर कुमार दास आणि डॉग स्कॉड प्रमुख उपनिरीक्षक अजित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप माने, संतोष भोर, वैभव पाटील, प्रशांत भोईटे, गणेश भोर, तुषार पुराणिक आणि शंकर एडले यांच्या सहकार्याने आरपीएफचे प्रशिक्षित श्‍वान मायलो आणि चेतक यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या हुशार श्‍वानांनी केवळ आपले कौशल्यच दाखवले नाही, तर आपल्या प्रात्यक्षिकातून स्वच्छता आणि सुरक्षा या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर संदेशही दिला.

यांचे लाभले सहकार्य
‘सकाळ पेटोपिया’ला पुणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. सारिका फुंडे-भोसले, पेट लव्हर्स क्लिनिकचे डॉ. विनय गोरे, पेट लव्हर्सचे संचालक अक्षय आबनावे, एएसएम ग्रोवेल फीड्सचे सोहेल शेख, चीटोज फाउंडेशनच्या संस्थापक श्रेयसी मुजुमदार, ब्लू हेवन ॲक्वेरिअमचे संचालक मिलिंद जोशी, ‘पेट्स ॲण्ड मी’चे संचालक निखिल केंजळे, सुहाना मसालेचे सहाय्यक व्यवस्थापक कौस्तुभ शेडे, मॅनकाईंड्स पेटस्टारचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन सोनावणे, बॉउलर्स पेट फूडचे रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT