पुणे

विद्यार्थ्यांच्या जल्लोषात सकाळ करंडकाची नांदी पुणे विभागीय अंतिम फेरी ः पहिल्या दिवशी पाच एकांकिकांचे सादरीकरण

CD

पुणे, ता. २ ः ‘अरे आव्वाज कुणाचा’, ‘अरे करंडक कुणाचा’ अशा घोषणांनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सादरीकरणाने सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीची नांदी झाली. अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या हस्ते रविवारी स्पर्धेचे उद्‍घाटन झाले.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ही स्पर्धा राज्यभरात सहा विभागांमध्ये होत असून, पुणे केंद्रावरील विभागीय अंतिम फेरीने या स्पर्धेला सुरवात झाली. सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे ही विभागीय अंतिम फेरी होत आहे. स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक हृषिकेश देशपांडे, स्नेहल तरडे, ‘रांजेकर रिअल्टी’चे संचालक अनिरुद्ध रांजेकर, ‘सकाळ’चे मल्टीमिडीया संपादक अंकित काणे आदी उपस्थित होते.

‘‘आमचा प्रवासही एकांकिकामधूनच सुरू झाला होता. नटांसाठी, लेखक-दिग्दर्शकांसाठी एकांकिका या रियाजाप्रमाणे असतात. या स्पर्धांमधून कलाकार तावून-सुलाखून बाहेर पडतात. त्यामुळे या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. मात्र, स्पर्धांमध्ये जिंकणे-हरणे फारसे महत्त्वाचे नसते; कारण तो त्या-त्या स्पर्धेतील परीक्षकांचा कौल असतो. कलाकारांनी आपल्या कामात सातत्य राखणे गरजेचे आहे.’’ असा सल्ला अविनाश नारकर यांनी विद्यार्थी कलाकारांना दिला.
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाचे सध्या प्रयोग सुरू असून, अभ्यास म्हणून हे नाटक बघण्यासाठी अवश्य या, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थी कलाकारांना केले. ‘‘स्पर्धा ही आपल्या जाणिवा-नेणीवा प्रगल्भ करणारी प्रक्रिया आहे. यातूनच आपल्याला अनेक नव्या गोष्टी गवसतात. या प्रक्रियेचा आनंद घ्या.’’ अशा शुभेच्छा ऐश्वर्या नारकर यांनी दिल्या.

उद्‍घाटनानंतर तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या ‘रात्र माणसाळलेली’ या एकांकिकेने स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर अहिल्यानगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजची ‘पिसाळ’ आणि बिबवेवाडीच्या ‘व्ही. आय. टी.’ची ‘सुपारी डॉट कॉम’ ही एकांकिका सादर झाली. दुपारच्या सत्रात आकुर्डीच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या ‘जनावर’ आणि तळेगावच्या ‘नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या ‘भेटली तू पुन्हा’ या एकांकिकेचे सादरीकरण झाले. सोमवार (ता. ३) आणि मंगळवारी (ता. ४) अनुक्रमे आठ आणि सात एकांकिकांचे सादरीकरण आहे. स्पर्धा पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे.
----
स्पर्धेचे सोमवारचे (ता. ३) वेळापत्रक (वेळ, महाविद्यालय, एकांकिका या क्रमाने) ः
सकाळी ९ ते १० - डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, पिंपरी - फक्त दोन दिवस - ऑफलाइन
सकाळी १० ते ११ - अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर - शुद्धीचा पायंडा
सकाळी ११ ते १२ - एम. आय. टी. महाविद्यालय, आळंदी - एकला चलो रे
दुपारी १२ ते १ - मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर - मॅटिल्डा जंक्शन
दुपारी २ ते ३ - डॉ. डी. वाय. पाटील, आंबी (पिंपरी-चिंचवड) - युवा सक्षमीकरण
दुपारी ३ ते ४ - अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, शुक्रवार पेठ - नांदी
दुपारी ४ ते ५ - अनंतराव पवार अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, पर्वती - सत्य शोध सुंदरम्
सायंकाळी ५ ते ६ - एम. आय. टी. एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर - सत्याची चाल

फोटो ः 16558, 16556, 64547

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT