पुणे

आंदेकर टोळीतील १० जणांवर गुन्हा

CD

पुणे, ता. २ : कोंढव्यातील खडी मशिन चौक परिसरात रिक्षाचालकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने रविवारी तीन आरोपींना गुरुवार (ता. ६) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
गणेश किसन काळे (३२, रा. येवलेवाडी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी किसन धोंडिबा काळे (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय ३१), बंडू आंदेकर (वय ६९, रा. नाना पेठ), आमीर खान (वय २५), मयूर वाघमारे (वय २३), स्वराज वाडेकर (वय २५), अमन मेहबूब शेख (वय २०), अरबाज अहमद पटेल (वय २४), मयूर दिगंबर वाघमारे (वय २३, तिघे रा. काकडे वस्ती, कोंढवा) आणि अन्य दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यापैकी अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे यांना अटक केली तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काही आरोपी अन्य गुन्ह्यात कारागृहात आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक गणेश काळे हा शनिवारी सायंकाळी खडीमशीन चौकातील पेट्रोल पंपाजवळ थांबला होता. त्यावेळी आंदेकर आणि इतर तिघांच्या सांगण्यावरून अमन शेख, अरबाज पटेल आणि इतर दोन अल्पवयीन मुलांनी गणेशवर पिस्तुलातून गोळ्या झाडून करून खून केला. गणेश हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ असून, तो सध्या येरवडा कारागृहात आहे.

खुनाचा बदला घेण्यासाठी...
या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी आंदेकर टोळीचे सदस्य आहेत. आरोपींनी वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर यांच्या खुनामधील आरोपी समीर काळेचा भाऊ गणेशवर नजर ठेवून सार्वजनिक ठिकाणी त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याचा कट कोठे रचला? यात कोणाचा सहभाग आहे का? यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. यादव यांनी तीनही आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत पवार आणि ॲड. मिथुन चव्हाण यांनी बाजू मांडली. मूळ फिर्यादी यांच्यावतीने ॲड. विजय लेंघरे यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT