पुणे

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती गठित

CD

पुणे, ता. २ : शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी आणि शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती गठित केली आहे. या समितीमध्ये सहकार आयुक्त दीपक तावरे, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे.
राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परिणामी अनेक शेतकरी बँकांकडून घेतलेले पीककर्ज वेळेत फेडू शकत नाहीत आणि थकबाकीदार ठरतात. त्यामुळे त्यांना पुढील हंगामात नव्याने कर्ज मिळवणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीसंदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघावा, त्यांचे जीवनमान उंचवावे आणि शेती क्षेत्रात स्थैर्य निर्माण व्हावे, या उद्देशाने ही समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती सरकारला अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचविणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे शाश्‍वत धोरण ठरवले जाणार आहे. या समितीमध्ये महसूल, वित्त, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव (सहकार व पणन), महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक आणि सहकार आयुक्त यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT