पुणे

विप्रो’कडून तरुणींसाठी संतूर शिष्यवृत्ती सुरू

CD

पुणे, ता. ६ : ‘विप्रो कन्झ्युमर केअर ॲण्ड लाइटिंग’ने विप्रो केअर्सच्या सहकार्याने यंदा राज्यात आपला प्रमुख संतूर शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि अविकसित जिल्ह्यांतील तरुणींना सशक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा उपक्रम त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देईल, त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन देईल आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत करेल.
यंदा या कार्यक्रमांतर्गत राज्यातील बारावीनंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना शिष्यवृत्ती दिली जाईल. निवड झालेल्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी शिक्षण शुल्क आणि इतर शिक्षणाशी संबंधित खर्चांसाठी दरवर्षी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळेल. शिष्यवृत्तीसाठी १ ते २० ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. www.santoorscholarships.com या संकेत स्थळावर अर्ज करता येईल.
याबाबत ‘विप्रो लिमिटेड’चे ​​ग्लोबल प्रमुख, सस्टेनेबिलिटी ॲण्ड ईएसजी व ‘विप्रो फाउंडेशन’चे व्यवस्थापकीय ट्रस्टी पी. एस. नारायण म्हणाले, ‘‘आम्ही नेहमीच मानत आलो आहोत की, शिक्षण हे चांगल्या समाजासाठी मुख्य साधन आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षणासाठी समान संधी मिळेल यासाठी प्रयत्न करतो, जे त्यांच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. राज्यात संतूर शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT