पुणे

सायबर चोरट्यांचा सव्‍वादोन कोटींवर डल्ला

CD

पुणे, ता. ९ : शेअर मार्केटमध्‍ये भरघोस परतावा मिळवून देण्‍याच्‍या बहाण्‍याने, तसेच मनी लाँड्रिंगची भीती, संशयास्‍पद लिंक पाठवून, तर काहींना नोकरीचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत आठ जणांना कोट्यवधींचा चुना लावला. यामध्‍ये एकत्रित दोन कोटी ३१ रुपयांची फसवणूक करण्‍यात आली असून, त्‍याबाबत वेगवेगळ्या पोलिस ठाण्‍यांत गुन्‍हे दाखल झाले आहेत.
शहरातील एका ज्येष्ठ महिलेच्‍या मोबाईलवर संपर्क करून तुम्ही बेकायदा पैशांची देवाण-घेवाण (मनी लाँड्रिंग) केल्‍याचे सांगत त्‍याबाबत कारवाई करण्‍याची भीती सायबर चोरट्यांनी दाखवली. तिच्‍या खात्‍यावरून तब्‍बल ९९ लाख रुपये चोरट्यांच्या खात्‍यावर पाठवून फसवणूक केली. हा प्रकार ३१ ऑक्‍टोबर रोजी ऑनलाइनद्वारे घडला. दुसऱ्या घटनेत खराडी येथील २३ वर्षीय तरुणीच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी लिंक पाठवून एक प्रक्रिया पूर्ण करण्‍यास सांगत त्‍याद्वारे जास्‍तीचा परतावा मिळवून देण्‍याच्‍या आमिषाने ६ लाख ४२ हजारांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत खराडी पोलिस ठाण्‍यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे.
मद्य तयार करण्‍याच्‍या कंपनीत मनुष्यबळ व्‍यवस्‍थापक असल्‍याचे फोनवर सांगून कंपनीत नोकरी देण्‍याच्‍या बहाण्‍याने अज्ञात चोरट्यांनी मार्केट यार्ड येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय व्‍यक्‍तीची १० लाख ९३ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार यावर्षी आठ मे ते ३० जूनदरम्‍यान घडला, तर सिंहगड रस्‍त्‍यावरील ५८ वर्षीय व्‍यक्‍तीला शेअर ट्रेडिंगच्‍या माध्‍यमातून गुंतवणूक करून चांगल्‍या परताव्‍याच्या आमिषाने अज्ञात सायबर चोरट्यांनी त्‍यांची ६ लाख ७० हजारांची फसवणूक केली. अशाच प्रकारच्‍या फसवणुकीच्या माध्‍यमातून विमानतळ येथील ५८ वर्षीय महिलेला ३१ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला. त्‍याचप्रमाणे महं‍मदवाडी येथील ७८ वर्षीय ज्‍येष्‍ठालाही अज्ञात सायबर चोरट्यांनी तब्‍बल ४२ लाख ५० हजारांचा चुना लावला. तसेच केशवनगर, मुंढवा येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय व्‍यक्‍तीला ५ लाख ३ हजारांचा गंडा घातला. तर गणेशखिंड येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला २९ लाख रुपयांचा गंडा घातला. या सर्व प्रकरणांत वेगवेगळ्या पोलिस ठाण्‍यांमध्‍ये स्‍वतंत्र गुन्‍हे दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Numerology Prediction : 'या' मूलांकाच्या लोकांना होईल धन लाभ; आयुष्यात येतील चढउतार, अंकशास्त्रानुसार तुमचा आठवडा कसा असेल? पाहा

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

SCROLL FOR NEXT