पुणे

हजारो उमेदवारांचा तीन वर्षांचा संघर्ष वाया लिपिक-टंकलेखक भरतीची प्रतीक्षा यादी न लावल्याने उमेदवारांचा संताप - लिपिक-टंकलेखक भरतीची प्रतीक्षा यादी न लावल्याने उमेदवारांचा संताप

CD

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘लिपिक-टंकलेखक (गट-क) २०२३’ भरती प्रक्रियेला जवळपास तीन महिने उलटून गेले असले तरी हजारो पात्र उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. आयोगाने कोणतेही ठोस कारण नसताना अचानक प्रतीक्षा यादी जाहीर न करण्याची भूमिका घेतल्याने सुमारे अडीच हजारांहून अधिक पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांत संतापाची लाट उसळली आहे. आम्ही पात्र असताना सरकार आणि आयोगाच्या मनमानी कारभारामुळे हजारो उमेदवारांचा तीन वर्षांचा संघर्ष व्यर्थ गेला असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
आयोगाने ७ हजार ६ जागांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. ३० एप्रिल रोजी पूर्व परीक्षा, १७ डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा आणि जुलै २०२४ मध्ये कौशल्य चाचणी घेण्यात आली. त्यानंतर १६ एप्रिल २०२५ रोजी तात्पुरती निवड यादी आणि ११ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. या निकालानुसार ७ हजार ६ पैकी ६ हजार ५१९ उमेदवारांची शिफारस झाली. अनेक पात्र उमेदवार आरक्षित प्रवर्गात परत गेल्याने ४८७ पदे रिक्त ठेवण्यात आली. तसेच माहिती अधिकार कायद्यानुसार (आरटीआय) मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष नियुक्ती फक्त ४ हजार २६५ उमेदवारांनाच देण्यात आली असून, उर्वरित २,७०० पेक्षा जास्त पदे अजूनही भरली गेलेली नाहीत. त्यामुळे प्रतिक्षा यादी जाहीर करून ही पदे भरण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ‘‘आयोगाने या भरती प्रक्रियेसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये प्रतीक्षा यादी जाहीर होणार नाही, असा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र अंतिम निकालानंतर अचानक प्रतीक्षायादी जाहीर होणार नसल्याची अन्यायकारक भूमिका घेण्यात आली. आम्ही तीन वर्षे या भरतीसाठी तयारी केली. पूर्व, मुख्य आणि कौशल्य चाचणी या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झालो. मात्र, या निर्णयामुळे नियुक्ती मिळाली नाही. प्रतीक्षा यादी जाहीर केली असती, तर आमच्यासारख्या पात्रांना न्याय मिळाला असता.’’
यासंदर्भात आयोगाने ‘ही भरती २७८ वेगवेगळ्या प्राधिकरणातील पदांसाठी असल्याने प्रतीक्षा यादी लागू करणे शक्य नसल्याचे’ एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
------------------

आयोग उदासीन...
कोकण विभागातील सहसंचालक, लेखा व कोशागार कार्यालयासाठी ‘लिपिक-टंकलेखक’ संवर्गाच्या १०२ उमेदवारांची शिफारस यादी आयोगाकडून मिळाली होती. मात्र, त्यापैकी १८ उमेदवार विविध कारणांमुळे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्या १८ जागा सध्या रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर सहसंचालक कार्यालयाने आयोगाला पत्र पाठवून, या अनुपस्थित उमेदवारांऐवजी त्याच प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांची शिफारस करावी, अशी विनंती केली आहे. मात्र, राज्यातील अनेक विभागांकडून अशीच मागणी करण्यात आली असतानाही आयोग मात्र यासंदर्भात उदासीन असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
---------------------
‘‘भरती प्रक्रिया २०२१ आणि २०२२ मध्ये बहुप्राधिकरण स्वरूपाची होती, पण त्या वेळी प्रतीक्षा यादी लावली गेली होती. मग २०२३ मध्येच ती का थांबवली? हे आयोगाचे निर्णय एकसंध नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य या भरतीवर अवलंबून आहे. वर्षानुवर्षे अभ्यास आणि कष्ट करून आम्ही पात्र ठरलो, मात्र सरकार आणि आयोगाने आमच्याकडे पाठ फिरवली. हजारो पदे रिक्त असतानाही आम्हाला नियुक्ती न देणे हा आमच्यावर अन्याय आहे.’’
- एक विद्यार्थी
------------------
‘‘राज्यात बेरोजगारी झपाट्याने वाढत असताना पात्र उमेदवार तीन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. आयोगाच्या प्रतीक्षायादी जाहीर न करण्याच्या निर्णयाने आमचे भविष्य अंधारात ढकलले. यामुळे उमेदवारांमध्ये नकारात्मकता आणि मानसिक ताण वाढत

आहे. या भरतीतील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून, प्रतीक्षा यादीद्वारे पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.’’
- एक विद्यार्थी
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : नागपूरमध्ये अजनी रेल्वे स्थानकावर हायलर्ट ; डॉग्सस्कॉड कडून तपासणी

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT