पुणे

कसब्यातील अतिक्रमणे, फलकांवर कारवाई करा

CD

पुणे, ता. ११ : कसबा मतदारसंघातील पायाभूत सुविधांशी संबंधित त्रुटी व समस्या महिनाभरात दूर कराव्यात, रस्त्यांवरील राडारोडा, बेवारस वाहने तसेच अतिक्रमण आणि अनधिकृत फलकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघात आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, भाजप मंडल अध्यक्ष अमित कंक, प्रशांत सुर्वे, छगन बुलाखे, समन्वयक राजेंद्र काकडे आदी उपस्थित होते.
मनोज पाटील म्हणाले, ‘‘वाहतुकीला अडथळा ठरणारी बेवारस वाहनांची छायाचित्रे नागरिक ‘पीटीपी ट्रॅफिक'' या ॲपच्या माध्यमातून फोटो पाठवू शकतात, वाहतूक विभागाकडून ती हटवण्यात येतील. शहराच्या मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुरू आहेत.’’
आमदार रासने म्हणाले ‘‘कसबा मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला अधिकाऱ्यांसह पाहणी दौरे सुरू आहेत. २६ जानेवारीपर्यंत ‘मिशन ९० दिवस’ राबविण्यात येणार असून त्यातून सुसज्ज रस्ते, अतिक्रमण आणि अनधिकृत फलकमुक्त फुटपाथ, वाहतूक कोंडी कमी करणे तसेच संपूर्ण परिसर कचरामुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे.’’

दुहेरी वाहतुकीला परवानगी
भवानी पेठेतील पालखी विठोबा चौक ते रामोशी गेट रस्ता मोठा असून देखील कॅम्प परिसरात जाण्यासाठी एकेरी वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा वळसा घ्यावा लागत होता. पाहणी दरम्यान आमदार रासने यांनी ही बाब मनोज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्काळ दुहेरी वाहतुकीस परवानगी देण्यात आली, त्यामुळे नागरिकांची १० वर्षांपासून असणारी समस्या मार्गी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Highway Crash : मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर धडक; १ ठार, २ जखमी!

Solapur Politics : मंगळवेढ्यात भाजपाकडे नगराध्यक्षसह, नगरसेवकपदासह ६२ जणांचे अर्ज!

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

SCROLL FOR NEXT