पुणे

‘टाइप ५’ मधुमेहाला अधिकृत मान्यता

CD

पुणे, ता. ११ : कुपोषण आणि अल्प पोषणामुळे होणाऱ्या मधुमेहाच्या ‘टाइप ५’ या प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली आहे. या नव्या प्रकारावरील संशोधन वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाले असून, या शोधनिबंधात पुण्यातील केईएम रुग्णालयाचे ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांचा सहभाग आहे. या प्रकारात ‘टाइप १’ किंवा ‘टाइप २’ मधुमेहासारखी लक्षणे नसतात, त्यामुळे चुकीचा उपचार घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

देशातील आणि अन्य विकसनशील देशांतील अनेक मधुमेही रुग्ण कमी वजनाचे आणि अल्पपोषित असतात. त्यांच्या शरीरात इन्शुलिनचे प्रमाण कमी असते; मात्र ‘टाइप १’ मधुमेहासारखी तीव्र लक्षणे दिसत नाहीत. अशा रुग्णांना पूर्वी ‘मालन्युट्रिशन रिलेटेड डायबेटिस’ म्हणून ओळखले जात होते. जागतिक आरोग्य संघटनेने १९८५ मध्ये या प्रकाराला मान्यता दिली होती, मात्र पुरेशा माहितीअभावी १९९९ मध्ये ती मागे घेतली. आता ‘इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन’ने एप्रिलमध्ये झालेल्या परिषदेत ‘टाइप ५’ मधुमेहाला अधिकृत मान्यता देत पुढील संशोधनासाठी कार्यकारी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती डॉ. याज्ञिक यांनी दिली.

या शोधनिबंधात तज्ज्ञांनी नमूद केले आहे की, ‘टाइप ५’ मधुमेहाचे रुग्ण कमी खातात, जास्त शारीरिक परिश्रम करतात, आणि त्यांचे जन्मतः वजनही सरासरीपेक्षा कमी असते. त्यांच्या स्वादुपिंडाची कार्यक्षमता सामान्य दिसते आणि आनुवंशिक बदलांचा ठोस पुरावा सापडत नाही. त्यामुळे या प्रकाराचे मूळ कारण शोधण्यासाठी आणखी सखोल संशोधनाची गरज आहे, असे डॉ. याज्ञिक यांनी सांगितले आहे. डॉ. याज्ञिक म्हणाले, ‘‘या आजारावर अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. आनुवंशिक घटक, गर्भावस्थेतील पोषणस्थिती आणि हवामानातील बदल या सर्वांचा विचार करून संशोधन झाल्यास प्रतिबंध आणि उपचाराची दिशा निश्चित होईल.’’
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Highway Crash : मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर धडक; १ ठार, २ जखमी!

Solapur Politics : मंगळवेढ्यात भाजपाकडे नगराध्यक्षसह, नगरसेवकपदासह ६२ जणांचे अर्ज!

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

SCROLL FOR NEXT