पुणे

‘इंद्रधनुष्य २०२५’मध्ये पुणे विद्यापीठाचे सप्तरंगी यश

CD

पुणे, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या संघाने जळगाव येथे नुकत्याच झालेल्या ‘इंद्रधनुष्य २०२५’ आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवामध्ये एकूण सात पारितोषिके पटकावली. विद्यापीठाच्या एकांकिकेच्या संघाने, तसेच ललित कला गटामधील मातीकाम स्पर्धेमध्येही विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने पहिले पारितोषिक पटकावले.
राज्यपाल कार्यालयामार्फत राज्यभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ‘इंद्रधनुष्य’ या आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोव्हेंबरच्या सुरुवातीला हा युवक महोत्सव झाला. महोत्सवाचे उद्‌घाटन अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते झाले. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी गायक आदर्श शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महोत्सवांतर्गत रंगलेल्या एकूण २९ स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. महोत्सवातील एकांकिका आणि मातीकाम स्पर्धेतील प्रथम क्रमांकाबरोबरच पुणे विद्यापीठाने भारतीय सुगम गायन, भारतीय शास्त्रीय गायन आणि पाश्चिमात्य एकल गायन स्पर्धांमध्ये द्वितीय पारितोषिके पटकावली. नाट्यसंगीत आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत पुणे विद्यापीठाच्या संघाला तिसरे पारितोषिक मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT