पुणे

शिक्षकेतर महामंडळातर्फे सोमवारी महामोर्चा

CD

पुणे, ता. १४ : शिक्षकेतरांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय मिळविण्यासाठी शिक्षकेतर महामंडळातर्फे सोमवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता शनिवार वाडा ते आयुक्त कार्यालय व शिक्षण संचालक कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष विनोद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, आदी उपस्थित होते. गोरे म्हणाले, ‘‘२००५पासून माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे, कर्मचारी संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, कर्मचारी कामाच्या ओझ्याने प्रचंड तणावात आहेत. शिक्षकेतरांच्या मागण्या रास्त असून त्या शासनाने मान्य कराव्यात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची घोर निराशा चालू आहे. भावी समाजाची पिढी घडविणाऱ्या ज्ञानमंदिरात शिक्षक, शिक्षकेतरांची पदे भरण्याचा यांना विसर पडलेला आहे.’’

प्रमुख मागण्या
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तत्काळ सुरू करावी
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०:२०:३० वर्षानंतरचा लाभ तत्काळ लागू करण्यात यावा
- माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती देण्यात यावी
- महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे नियमित वेतनश्रेणीत करण्यात यावी
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, शिपाई यांच्या वेतनातील त्रुटी तत्काळ दूर करून नियमित वेतन मिळावे
- न्यायालयीन निर्णयानुसार राज्यातील सर्व पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी
- विनाअनुदानित तुकडीवरील विद्यार्थीसंख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरण्यात यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT